वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
6000 एमएएचच्या दमदार बॅटरीसह टेक्नो मोबाईल कंपनीचा टेक्नो पोवा निओ 5-जी स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. सदरच्या फोनची किंमत 15 हजार 499 रुपये असणार आहे.
8 दिवस म्युझिक प्ले बॅकसह 30 दिवस स्टँडबायसह येणाऱया स्मार्टफोनची ऑनलाईन, ऑफलाईन विक्री सोमवारपासून सुरू झाली आहे. सदरच्या स्माटंफोमध्ये 13 मेगापिक्सल क्वॉड व 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असणार असून 6 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेजची यात व्यवस्था आहे. एक महत्त्वाचे म्हणजे या फोनमध्ये 30 हजार फोटो, 2300 म्युझिक फाईल्स, 300 गेम्स व 200 व्हिडिओ साठवता येणार आहेत. 18 डब्ल्यूचा चार्जर असल्याने मोबाईल लवकर चार्ज होतो. हेलियो जी-800 ऑक्टाकोर गेमिंग प्रोसेसरसह 6.8 इंचाची डिस्प्ले स्क्रीन याला असेल.
थोडक्यात वैशिष्टय़े
w6000 एमएएचची दमदार बॅटरी
wमॅजिक ब्ल्यू, स्पीड पर्पल व डॅझल ब्लॅक या रंगात
wगेम खेळणाऱयांसाठी उपयुक्त
w30 दिवसांचा स्टँडबाय
w6.8 इंचाची डिस्प्ले स्क्रीन