नवी दिल्ली
नुकत्याच प्राप्त झालेल्या कंत्राटाच्या ऑर्डरमुळे टेक्नोइलेक्ट्रिकचा समभाग शेअर बाजारात चांगली तेजी प्राप्त करताना दिसला आहे. सदरचा समभाग बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 12 टक्के इतका वधारुन 314 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. कंपनीला अलीकडेच राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगमकडून 1455 कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे.