व्यवस्थापन आणि व्यवस्थापक या उभयतांसाठी ज्ञान आणि तंत्रज्ञान या उभयतांचे पाठबळ मिळणे सध्याच्या प्रगत स्थितीत अत्यावश्यक ठरते आहे. वेळेत घेतलेले अचूक निर्णय व्यावसायिक संदर्भात नेहमीच फायदेशीर ठरतात. व्यवस्थापनाशी निगडीत व महत्त्वाच्या अशा तंत्रज्ञानात गेल्या काही वर्षात संगणकावर आधारित अशा माहिती-तंत्रज्ञानाची भर पडली असून त्याचे व्यवस्थापन आणि व्यवस्थापक या उभयतांवर झालेले परिणाम व फायदे मुळातूनच पडताळण्यासारखे ठरले आहेत.
कंपन्यांमध्ये कर्मचाऱयांची नेहमीच गरज भासते. कर्मचाऱयांची ही आवश्यकता सर्व स्तरांवर व वेगवेगळय़ा कारणांनी भासते. यातही माहिती-तंत्रज्ञान व्यवसाय क्षेत्र नेहमी अग्रणी ठरते. सद्यस्थिती त्याला अपवाद नाही. सद्यस्थितीत व अद्ययावत माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे सांगायचे झाल्यास आगामी काही महिन्यांमध्ये व्यावसायिक क्षेत्राच्या गरजांनुरुप सांगायचे झाल्यास ‘नोकरी’ या रोजगार पुरवणाऱया पोर्टलनुसार सद्यस्थितीत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच 59 टक्के कर्मचाऱयांची नव्याने गरज भासणार आहे. त्यानंतर व्यवसाय विकास क्षेत्रात 43 टक्के व मार्केटिंगमध्ये सुमारे 36 टक्के कर्मचाऱयांची नव्याने गरज भासणार आहे. ही माहिती ‘नोकरी’च्या नव्या संगणकीय पद्धतीने करण्यात आलेल्या रोजगार सर्वेक्षणात नमूद करण्यात आली आहे.
‘नोकरी’ने गेल्या महिन्यात केलेल्या या नव्या रोजगार सर्वेक्षणाला संगणकीय तंत्रज्ञानाची साथ मिळाल्याने त्याला अचूकता व अद्ययावततेची साथ लाभली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्या व रोजगार सल्लागारांनुसार नव्या रोजगार गरजांमध्ये सर्वाधिक मागणी ही संबंधित क्षेत्रात सुमारे 3 ते 5 वर्षे अनुभव असणाऱया अनुभवी उमेदवार-कर्मचाऱयांची राहणार आहे. या कर्मचाऱयांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे 67 टक्के असेल.
याच सर्वेक्षणानुसार नव्या जागांसाठी आवश्यक अशा 1 ते 3 वर्षे अनुभव असणाऱया कर्मचाऱयांची संख्या व टक्केवारी 53 टक्के व एवढीच टक्केवारी 5 ते 8 वर्षे अनुभव असणाऱया कर्मचाऱयांची असेल, असे नमूद करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे ही आकडेवारी व टक्केवारी अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित असल्याने त्याचे महत्त्व अर्थातच वाढले आहे.
वरील तथ्य व आकडेवारी नेमकी शोधून मांडण्यासाठी माहितीला तंत्रज्ञानाची आवर्जून जोड देण्यात आली, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून वरील माहितीचे संकलन करताना संबंधित उमेदवारांच्या शिक्षण-अनुभव या मूलभूत व महत्त्वाच्या माहितीच्या जोडीला कर्मचाऱयांची भावनिक क्षमता, परस्पर संबंध, संवादप्राविण्य, कामाच्या संदर्भातील प्राधान्य इत्यादींचे संकलन शक्मय झाले आहे.
यासंदर्भात लक्षणीय बाब म्हणजे विशेषतः अनुभवी कर्मचारी नोकरीमध्ये बदल करताना अथवा कंपनी सोडण्यापूर्वी त्यावर बराच विचार केला जातो. कर्मचारी आपले मित्र व सहकाऱयांशी खल करतात. कंपनी-कॉर्पोरेट क्षेत्रात यालाच ‘वॉटर कूलर पे चर्चा’ असे संबोधिले जाते. या चर्चेचा कंपनी-कर्मचाऱयांमधील परस्पर संबंध व कर्मचाऱयांनी नोकरी सोडून जाणे याचा परस्पर संबंध असतो.
व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रात काम करणाऱया ‘जेनपॅक्ट’ कंपनीने कंपनींतर्गत कर्मचाऱयांच्या ‘वॉटर कूलर चर्चा’ व त्यामध्ये येणाऱया विविध मुद्दय़ांचा व्यवस्थापकीय संदर्भात अभ्यास करून काही महत्त्वाचे निकष काढले आहेत. ‘जेनपॅक्ट’नुसार कंपनीमध्ये व कंपनींतर्गत होणाऱया कर्मचाऱयांच्या अनौपचारिक चर्चेचे मोठे महत्त्व असल्याने त्याकडे पुरेसे व वेळेत लक्ष देणे आवश्यक ठरते. यासंदर्भात केलेल्या अभ्यासानुसार कर्मचाऱयांमध्ये होणाऱया चर्चेत त्यांचे नैराश्य-वैतागापासून कर्मचाऱयांच्या अडचणी, समस्या एवढेच नव्हे तर व्यवसायवाढीपर्यंत सूचना करण्याच्या महत्त्वपूर्ण मुद्दय़ांचा समावेश असू शकतो. त्याची नेमकी नोंद घेऊन व्यवस्थापक व व्यवस्थापनाने काम करणे कंपनी-कर्मचारी या उभयतांना फायदेशीर ठरणार असल्याने त्याकामीदेखील माहिती-तंत्रज्ञान संकलनाचा फायदा होऊ शकतो.
माहिती-तंत्रज्ञानावर अद्ययावत पद्धती उपलब्ध असणाऱया तपशिलानुसार सद्यस्थितीत कर्मचाऱयांचे नोकरी सोडून जाण्याचे 19.66 टक्के प्रमाण हे माहिती-तंत्रज्ञान उद्योगात असून त्याखालोखाल टक्केवारी क्रमशः शैक्षणिक क्षेत्र 15.15 टक्के, आरोग्य व औषध निर्माण 11.29 टक्के, ज्ञान आधारित प्रक्रिया उद्योग 10.10 टक्के व ई-कॉमर्स व स्टार्टअप तंत्रज्ञान क्षेत्र 9.09 टक्के असे आढळून येते. याचाच परिणाम म्हणून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या कर्मचाऱयांची भरती करण्याचे प्रमाण 2021-22 या आर्थिक वर्षात 61 टक्के होते तर नव्या म्हणजेच 2022-23 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या पहिल्याच तिमाहीत हे प्रमाण 65 टक्के असण्याची साधार भीती व्यक्त करण्यात येत आहे. देशांतर्गत सर्व उद्योग मिळून गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत नव्या कर्मचाऱयांची असणारी टक्केवारी 26 टक्के होती तर हीच टक्केवारी जानेवारी-मार्च-2022 या शेवटच्या आर्थिक तिमाहीत चक्क दुप्पट म्हणजे 54 टक्के झाल्याचे अद्ययावत माहितीच्या आधारे दिसून येते. या आव्हानपर परिस्थितीत तंत्रज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित बदलांमुळे उद्योग विश्वासमोर मोठी व विविध प्रकारची आव्हाने नव्या स्वरुपात उभी राहिली आहेत. परंपरागत शैक्षणिक पात्रता, अनुभव व व्यक्तिमत्त्व यांच्या जोडीलाच आता नवे वातावरण व बदलत्या संदर्भात अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञानाची जोड असणे व देणे नितांत आवश्यक आहे. त्याचदरम्यान ग्राहकांच्या बदलत्या गरजा व वाढती व्यावसायिक आव्हाने यामुळे व्यवस्थापन नव्या कर्मचाऱयांकडून पात्रता-ज्ञान व विज्ञान-तंत्रज्ञानाशिवाय तंत्रज्ञानावर आधारित अनुभवी व कार्यक्षम उमेदवार-कर्मचाऱयांच्या निवडीवर विशेष भर देत असते.
दरम्यान, ऍमेझॉन समूहांतर्गत कार्यरत असणाऱया ऍमेझॉन वेब सर्व्हिसेसद्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार व्यवसाय आणि संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित अशा संगणकीय तंत्रज्ञानविषयक कौशल्याची व अनुभवाची सध्या मोठी गरज भासणार आहे.
ऍमेझॉनच्या या सर्वेक्षणात पुढील बाबी प्रकर्षाने समोर आल्या आहेत-
@सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 92 टक्के कंपन्यांच्या मते त्यांच्या कर्मचाऱयांना संगणकीय प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांची उत्पादकता वाढली आहे.
@याशिवाय 95 टक्के कर्मचाऱयांनी विशेषतः कोरोनानंतरच्या व्यवसाय काळात त्यांना माहिती-तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचा विशेष फायदा झाला.
@सर्वेक्षणातील सुमारे 46 टक्के कर्मचाऱयांच्या मते त्यांना मिळणाऱया संगणकीय प्रशिक्षणाचा भविष्यकालीन प्रगत कामासाठी कितपत फायदा होऊ शकेल, याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
@महत्त्वाचे म्हणजे 90 टक्के कंपन्यांनी हे मान्य केले आहे, की कर्मचाऱयांना तंत्रज्ञान व संगणकीय पद्धतीचे प्रशिक्षण दिल्याने त्यांचे कंपनी सोडून जाण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे.
@तर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 95 टक्के कर्मचाऱयांनी त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणात अद्यापही अडचणी येत असल्याचे नमूद केले आहे.
सर्वेक्षणातील अन्य महत्त्वपूर्ण बाबी म्हणजे उद्योग-व्यवसायाशिवाय दैनंदिन कामकाजाला चालना देण्यासाठी आगामी वर्षात सुमारे 25 लाख कर्मचाऱयांना प्रगत व संगणकविषयक प्रशिक्षण देणे आवश्यक ठरणार आहे. याशिवाय बदलत्या व्यावसायिक गरजांची पूर्तता करण्यासाठी 2025 पर्यंत संगणकीय कार्यपद्धती, ग्राहक व्यवस्थापन यासारख्या कौशल्यांची मोठय़ा प्रमाणात मागणी राहणार असल्याचे पण ‘ऍमेझॉन’ सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. बदलत्या व आगामी व्यावसायिक गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यवसायाला संगणकीय पद्धतींसह तंत्रज्ञानाच्या वाढत्या गरजांची चुणूकही या सर्वेक्षणामुळे स्पष्ट झाली आहे. – दत्तात्रय आंबुलकर