तरुण भारत

टेक्नोचा फँटम एक्स स्मार्टफोन लाँच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कर्व्हड् अमोलेड डिस्प्लेसह टेक्नो कंपनीचा फँटम एक्स हा नवा स्मार्टफोन नुकताच बाजारात दिमाखात लाँच झाला आहे.

Advertisements

डय़ुअल सेल्फी कॅमेरासह 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सुविधेसह सदरचा फोन बाजारात दाखल झाला आहे. सदरचा स्मार्टफोन येत्या काळात विवो व्ही23ई, ओप्पो एफ21 प्रो व सॅमसंग गॅलक्सी एम53 या फोन्सना टक्कर देणार आहे. सदरच्या फोनची किंमत 25 हजार 999 रुपये असून सदरचा फोन आईसलँड ब्ल्यू व समर सनसेट रंगात उपलब्ध होणार आहे.

अमेझॉन ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा फोन 4 मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यासोबत ग्राहकांना 2999 रुपयांचा ब्लू टूथ स्पीकर खरेदी करता येणार आहे. स्क्रीन रिप्लेसमेंट सेवेचा एकदा लाभ ग्राहकांना उठवता येणार आहे.  कॅमेराही उत्तम प्रतीचा असणार आहे.

सदरच्या फोनची वैशिष्टय़े पाहूया-

@8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज, नॅनो सीम- अँड्रॉईड 11

@6.7 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, कॉर्निंग गोरिला ग्लास

@ट्रिपल रियर कॅमेरा, 50 मेगापिक्सल प्रायमरी, 13 मे. पि. अल्ट्रावाईड शूटर व 8 मे. पि. मायक्रो शूटर, 108 मेगापिक्सल अल्ट्रा एचडी मोड.

Related Stories

दोन वर्षांच्या वॉरंटीसोबत ‘वनप्लस 9’ होणार सादर

Patil_p

हॉनरचे लॅपटॉपसह 2 स्मार्टफोन्स सादर

Patil_p

‘हॉनर’चा नवा 5-जी स्मार्टफोन दाखल

Patil_p

शाओमीचा एमआय मिक्स फोल्ड-2 चालू वर्षाच्या मध्यावर होणार सादर

Patil_p

सॅमसंग आणणार स्वस्त स्मार्टफोन्स

Patil_p

रियलमी सी 25 एस लाँच

Patil_p
error: Content is protected !!