वृत्तसंस्था /अहमदाबाद
गुजरातच्या नवसारी जिल्हय़ात विवाहादरम्यान भेटवस्तूच्या स्वरुपात मिळालेल्या टेडी बियरमध्ये स्फोट झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या कटाचा गुन्हा नोंदवून दोन जणांना अटक केली आहे. या स्फोटात अलिकडेच विवाह झालेला व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. प्रत्यक्षात हा टेडी बियर एका व्यक्तीने नववधूच्या मोठय़ा बहिणीची हत्या घडवून आणण्यासाठी पाठविला होता. परंतु हा टेडी बियर चुकून नवविवाहितेच्या सासरी पोहोचला होता.
विवाहाच्या पाच दिवसांनी अलिकडेच विवाहबद्ध झालेला लतेश गावित भेटवस्तू उघडून पाहत होता. याचदरम्यान त्याने इलेक्ट्रॉनिक डेडी बियर पाहिल्यावर स्वतःच्या 3 वर्षीय पुतण्याला बोलाविले होते. त्यानंतर त्याने तो चालू करण्यासाठी प्लग लावल्यावर तेव्हा त्यात जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर लतेश आणि त्याचा पुतण्या रक्तबंबाळ स्थितीत आढळून आले. या स्फोटात लतेशच्या दोन्ही डोळय़ांमध्ये गंभीर ईजा झाली आहे. तर एक मनगट तुटून पडले.