प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस 1 नोव्हेंबरपासून करमळीऐवजी मडगावपर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
22119/22120 तेजस एक्स्प्रेस करमळीऐवजी मडगावपर्यंत नेण्याच्या मागणीला यश आले आहे. आता 1 नोव्हेंबरपासून ही एक्स्प्रेस मडगावपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. ही एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून पहाटे 5.50 वा. सुटून दुपारी 2.40 वा. मडगावला पोहचेल. मडगावहून दुपारी 3. 15 वा. सुटून त्याच दिवशी रात्री 11.55 वा. सीएसटीला पोहचेल.