Tarun Bharat

सांगलीचा तेजस सन्मुख ठरला सर्वोत्कृष्ट ‘युवा संसदरत्न’

Advertisements

 सांगली/प्रतिनिधी

 केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालय भारत सरकार चे सौजन्याने 16 व्या राष्ट्रीय युवा संसद मध्ये शिवाजी विद्यापीठ संघातून प्रतिनिधित्व करत केंद्रीय कृषीमंत्री पदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या तेजस सन्मुख यांना युवा संसदरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला. सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या कृषी सारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर त्यांनी अत्यंत अभ्यासुपणे उत्तरे दिली. तसेच बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक संदर्भातही उत्कृष्ट विवेचन केले. सभागृहातील मुद्देसूद विषय मांडणी, अभ्यासपूर्ण शब्दांकन, खुमासदार शैली, कृतिशील वावर, दर्जेदार शब्दफेक इत्यादी अंगभूत गुणाच्या आधारे तेजस सन्मुख यांना युवा संसदरत्न जाहीर करण्यात आले.

शेकडो विद्यार्थ्यांमधून 55 विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संघात सहभाग मिळविला. त्यातून 9 विद्यार्थ्यांना संसदरत्न घोषित करण्यात आले. यात तेजस सन्मुख अग्रभागी होते व सांगली जिल्ह्यातून निवड झालेले ते एकमेव सदस्य आहेत. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती व अथक परिश्रम हीच आजवर त्यांच्या यशाची गुरूकिल्ली ठरली आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाच्या परीक्षकांनी त्यांची युवा संसदरत्न निवड करत विशेष कौतुकही केले. तेजस सन्मुख यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एन.एस. सोटी विधी महाविद्यालय, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य व जिल्हा पदाधिकारी, विविध सामाजिक व राजकीय चळवळीतील सहकारी आणि मित्र परिवाराने त्यांचे प्रत्यक्ष भेटुन अभिनंदन केले आहे.

Related Stories

सांगली : पुरग्रस्त अद्याप वाऱ्यावरच…. ! नागठाण्यात संथगतीने पंचनामे सुरू…..

Archana Banage

Archana Banage

सांगली : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात

Archana Banage

सांगलीत हिसडा टोळीकडून सोन्याची साखळी लंपास

Abhijeet Khandekar

कर्नाटकात सातत्याने मराठी अस्मितेची गळचेपी – वैभव पाटील

Abhijeet Khandekar

सांगलीत उद्या जिजाऊ आदर्श आई पुरस्काराचे वितरण

Archana Banage
error: Content is protected !!