संवादानंतर शिवसेना पदाधिकारी झाले रिचार्ज, उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले त्यांचे स्वागत
प्रतिनिधी/ सातारा
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळख आहे. त्यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे जाताना सातारा येथे जिह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांची भेट घेतली. त्यांचे जिल्हा शिवसेनेच्यावतीने उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी स्वागत केले. त्यांच्या साताऱयातील पहिल्याच भेटीमध्ये जिह्यातील शिवसैनिक चांगले रिचार्ज झाले आहेत.
सातारा जिह्यातील शिवसेनेकडे सध्या प्राधान्याने राज्याचे लक्ष आहे. शिवसेनेतून बंड केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे सातारचे तर त्यांना साथ देणारे आमदार शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे हे ही सातारचे. त्यामुळे शिवसेनेचा मूळ सातारा जिह्यातील गट अधिक सक्षम कसा करता येईल यासाठी शिवसेनेकडून विशेष लक्ष सातारा जिह्यात घातले आहे. त्यासाठी दिवाकर रावते यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी जिह्यात दौरा करून शिवसेनेच्या पदाधिकाऱयांना निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले. त्यानंतर फक्त फलटणचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव हे शिंदे गटात दाखल झाले. बाकी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी निष्ठेने आणि आणखी दुप्पट वेगाने कामाला लागले. त्यात जिल्हाप्रमुख म्हणून पुन्हा हर्षद कदम या लढवय्या सच्चा शिवसेनेच्या ढाण्या वाघावर जबाबदारी सोपवली. त्यामुळे शिवसेनेत असलेले सर्वच पदाधिकारी सभासद नोंदणी जास्तीत जास्त कशी करता येईल यासाठी कामाला लागले. असे असताना शुक्रवारी दुपारी कोल्हापूर दौयावर निघालेले तेजस ठाकरे यांनी साताऱयात शिवसेनेच्या पदाधिकाऱयांची भेट घेतली. तेजस ठाकरे यांचे स्वागत शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अभिजित गार्डे यांनी सातारच्या पध्दतीने केले. साताऱयात प्रथमच तेजस ठाकरे हे आल्याने त्यांच्या सातारच्या भेटीने जिह्यातील शिवसैनिक आणखी जोराने कामाला लागल्याचे शिवसेनेतून सांगण्यात आले.