राज्यातील तेलंगणा राष्ट्र समिती सरकारवर टीका
ऑनलाईन टीम : हैदराबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर असून आज ( गुरुवारी ) त्यांचे तेलंगणामध्ये भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हैदराबादमधील बेगमपेट विमानतळावर भाजपचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. पंतप्रधानांनी ट्विटद्वारे, “हैदराबादमध्ये स्वागत समारंभामध्ये पोहोचले असे सांगितले.
इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, या हैदराबादमधील संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिना निमित्त समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. त्यांनतर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी राज्यातील तेलंगणा राष्ट्र समिती सरकारवर हल्ला चढवला. “परिवारवादी पक्ष फक्त स्वतःच्या विकासाचा विचार करतात. या पक्षांना गोरगरीब जनतेची पर्वा नसून एकाच कुटुंबाने सत्तेत राहून जमेल तशी लूट कशी करता येईल, यावर त्यांचे राजकारण केंद्रित आहे. त्यांना लोकांच्या विकासात रस नाही.” असे ते म्हणाले.