ट्रायची माहिती ः डिसेंबर तिमाहीमधील कंपन्यांची स्थिती
वृत्तसंस्था नवी दिल्ली
दूरसंचार कंपन्यांचे एकूण उत्पन्न हे डिसेंबर 2021 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत 2 टक्क्यांनी घटून ते 69,695 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांनी दिली आहे.
तिमाही कामगिरीच्या अहवालानुसार दूरसंचार सेवांमधून (टीएसपी) एकूण उत्पन्न हे एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत 71,588 कोटी रुपये राहिले होते. टीएसपीचे नियोजित एकूण उत्पन्न हे 15.81 टक्क्यांनी वधारुन 55,151 कोटी रुपयावर राहिले होते. हा आकडा 2020 च्या चालू तिमाहीत 47,623 कोटी रुपये होते. यामध्ये सरकार विविध शुल्क वसुल करत असते.
विविध कंपन्यांची कामगिरी ः
w जिओने डिसेंबर 2022 मध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत सर्वाधिक 19,063.75 कोटी रुपयांचा एजीआर नोंदवला आहे.
w भारती एअरटेल 4,484.48 कोटी रुपये
w व्होडाफोन-आयडिया 6,541.83 कोटी रू
w बीएसएनएल 1,94.94 कोटी रुपये
w टाटा टेलीसर्व्हिसेज 530.21 कोटी रुपये
w एमटीएनएल 254.78 कोटी रुपये
w रिलायन्स कम्युनिकेशन्स 61.69 कोटी रुपये
w क्वाड्रंट 13.22 कोटी रुपये