ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Telugu actor Chalapati Rao passed away प्रसिद्ध तेलुगू अभिनेते चलपती राव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
चलपती राव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. शनिवारी रात्री राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.
अधिक वाचा : उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवली होती; शिवतारेंचा गौप्यस्फोट
चलपती राव यांचा जन्म 8 मे 1944 रोजी आंध्रप्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील बल्लीपरु येथे झाला. त्यांनी 1966 मध्ये गुदाचारी 116 या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी आतापर्यंत 600 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांचे ‘साक्षी’, ‘ड्रायव्हर रामुडू’ आणि ‘वजराम’ असे अनेक चित्रपट हिट झाले. त्यांच्या पश्चात मुलगा अभिनेता रवी बाबू आणि मुली आहेत.