Tarun Bharat

तेलुगू योद्धाजची राजस्थानवर मात

Advertisements

गुजरातचा ओडिशा जगरनॉट्सवर 5 गुणांनी रोमांचक मात

वृत्तसंस्था/ पुणे

आदर्श मोहितेच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर तेलुगू योद्धाजने अल्टिमेट खो खो लीगमध्ये दुसरा विजय नोंदवताना राजस्थान वॉरियर्सचा 21 गुणांनी पराभव केला.

डिफेन्समध्ये पहिल्या डावात मोहितेने 3 मिनिटे 43 सेकंद बचाव केला, त्यानंतर 10 गुण नोंदवत तेलुगू योद्धाजला 68-47 असा मोठा विजय मिळवून दिला. मोहितेव्यतिरिक्त प्रसाद पाध्येने आक्रमणात दोन डाईव्ह्जसह 13 गुण नोंदवले तर रोहन शिंगाडेनेही 10 गुण मिळविले. राजस्थान वॉरियर्ससाठी कर्णधार मजहर जमादारने 17 गुण नोंदवले तर सुशांत काळढोणेने 9 गुण मिळविले.

Pune: Players of Telugu Yoddhas and Rajasthan Warriors play during their Ultimate Kho Kho League match, at the Shree Shiv Chhatrapati Sports Complex in Pune, Tuesday, Aug. 16, 2022. (PTI Photo)(PTI08_16_2022_000202B)

राजस्थानच्या अक्षय गणपुले व गोविंद यादव यांनी तेलुगू योद्धाजच्या बचावफळीची परीक्षा घेताना डिफेन्समधील दोन बोनसगुणही मिळविले. मात्र अरुण गुणकीने अप्रतिम पोल डाईव्ह मारत गोविंदला बाद करीत प्रतिस्पर्ध्याला 2 मिनिटे 36 सेकंदात सर्व बाद केले. योद्धाजने पहिल्या सत्रात राजस्थानवर 24-2 अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. राजस्थानने नंतर आक्रमणात जोरदार प्रत्युत्तर दिले. पण मोहितेला ते बाद करू शकले नाहीत. तीन मिनिटाहून अधिक काळ तो मॅटवर अपराजित राहिला. त्याच्या खेळीमुळे पहिल्या डावात तेलुगू योद्धाजने 30-20 अशी आघाडी घेतली. दुसऱया डावातही योद्धाजने जोम कायम ठेवत आघाडी वाढवताना आक्रमणात पहिल्या सात मिनिटातच 36 गुणांची कमाई केली. सोमवारी झालेल्या सामन्यात तेलुगू योद्धाजने पहिला विजय मिळविताना चेन्नई क्विक गन्सचा 48-38 अशा गुणांनी पराभव केला होता.

अन्य एका अटीतटीच्या झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने ओडिशा जगरनॉट्सचा 54-49 असा केवळ पाच गुणांनी पराभव करीत दुसरा विजय नोंदवला. 48-49 अशा स्थितीत सामना संपण्यास 9 सेकंद असताना रंजन शेट्टीने जगरनॉट्सच्या डिफेंडरला अप्रतिम पोल डाईव्हवर बाद करीत गुजरातला 54-49 असा रोमांचक विजय मिळवून दिला.

या लीगमधील सामने रोज सायंकाळी 7 वाजता सुरू होत असून सोनी टेन 1 (इंग्लिश) व सोनी टेन 3 (हिंदी व मराठी) या वाहिनीवरून त्याचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. याशिवाय सोनी एलआयव्हीवर लाईव्ह स्ट्रीमिंग केले जात आहे.

Related Stories

भारताचे माजी बॉक्सर डिंको सिंग यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

गुजरात टायटन vs दिल्ली कॅपिटल सामन्यावर सट्टा, 27 लाखांच्या रोकडसह तिघांना अटक

datta jadhav

फ्रेंच स्पर्धेत नदालचे 13 वे जेतेपद

Patil_p

स्टोक्सच्या गैरहजेरीत राजस्थानसमोर दिल्लीचे आव्हान

Patil_p

वनडे मानांकनात भारताची तिसऱया स्थानी झेप

Patil_p

अर्जेंटिना-पराग्वे सामना बरोबरीत

Patil_p
error: Content is protected !!