प्रतिनिधी /तिसवाडी
आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशीला पंढरपुरात जाऊन श्रीविठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्याच्या ओढीने व्याकुळ झालेले भक्तगण शेकडो किलोमीटरचे अंतर पार करुन पायी चालत पंढरपुरात जाऊन उभय देवतांच्या चरणी नतमस्तक होऊन धन्य होऊन जातात. अनेकांना ही वारी करणे शक्य नसते त्यांच्यासारखे अनेकजण गावच्या देवळातच विठ्ठलनामात तल्लीन होऊन जातात. छोटय़ा छोटय़ा पायी वाऱया गोव्यात काही ठिकाणी होत आहेत, त्यातही देवळाय खांडोळे येथून सुरु होऊन आखाडा बेटावरील श्रीपांडुरंग मंदिरातपर्यंत जाणारी छोटीशीच परंतु सर्वांचे लक्ष वेधून घेणारी वारी यंदाही भक्तीभावाने, उत्साहात साजरी झाली.
देवळाय – खांडोळे येथील प्रसिद्ध भजनीकलाकार, भजनीगुरु तथा पणजी दूरदर्शनचे निर्माते राजेंद्र नरसिह फडते यांच्या घरात देवपूजा करुन सकाळी ही वारी सुरु होते. दोन तासांनंतर आखाडा येथील श्रीपांडुरंग मंदिरात पोहोचते. यावर्षीही कोणत्याही अडथळय़ाविंना ती पार पडली. स्त्राr तसेच पुरुष भक्तगण मुखाने हरिनामाचा, श्रीरामाचा तसेच संतमांदियाळीचा जयघोष करत आखाडा बेटावर पोहोचली. मंदिराच्या प्रवेद्वारावर मंदिरातील आषाढी एकादशी उत्सवाच्या दांपत्त्याने त्यांचे चरण धुवून कपाळी टीळा लावून तसेच पुष्पवृष्टी करुन स्वागत केले. मंदिरात विठुरायाचा गजर करण्यात आला. त्यानंतर आरत्या व तीर्थ प्रसाद झाला.
जे भक्तगण पंढरपुराची वारी करु शकत नाहीत, त्यांना अशाप्रकारच्या छोटय़ा वारीतून विठ्ठलनामाचा जप करुन त्याच्या कृपेस पात्र होऊ शकतात.
फडते कुटुंबीयांना अनेकांची साथ
राजेंद्र नरसिंह फडते यांच्या बरोबर त्यांचे कुटुंबीय सौ. तनूजा राजेंद्र फडते, कु. प्राजक्ता राजेंद्र फडते, तसेच गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळातील डॉ, राजेंद्र लांबोर, दीपक गोवेकर, भरत निपाणीकर-पणजी, सौ. तामशी व महेश शेट-वळवई, सौ. प्रीती शिरोडकर, सौ. वृंदा व मोलू तारी, प्रवीण नाईक-मेरशी व अन्य विठ्ठलभक्त सहभागी झाले होते.
नाते विठ्ठलाशी, नाते गावाशी
फडते यांनी 2011 साली आपण पंढरपुरास जाऊ शकत नाही, पण देवळाय येथे आपण नव्याने बांधलेल्या घरापासून आपल्या मूळ गावी आखाडा येथे श्री पांडुरंगाचे दर्शन नक्कीच घेऊ शकतो, असा संकल्प करुन त्यांनी स्वतःच्या पत्नी सौ. तनुजासह ही छोटीशी वारी सुरु केली. आता दरवर्षी अनेक नवीन विठ्ठलभक्त या वारीत जोडले जातात. यापुर्वी फडते यांना पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या महापुजेचे दूरदर्शनवरुन करण्यात येणाऱया लाईव्ह प्रसारणाचे काम करण्याचे भाग्य लाभले आहे. आता या वारीतून जपले जाते विठ्ठलाचे नाते आणि आपल्या मूळ गावाशीही असलेलही नाते! फडतेंचे वडिल गोव्यातील प्रख्यात भजनी कलाकार नरसिंह फडते हे निस्सीम विठ्ठलभक्त होते. त्या काळात आखाडा, सांत इस्तेव्ह परिसरात विठ्ठलाचे नुसते नाव घेतले तरी परधर्मीय लोक टिंगलटवाळी, हेटाळणी करायचे. आज त्याच परिसरात ही वारी जाताना सारेजण भक्तीभावाने त्यांच्याकडे पाहतात, ही विठ्ठलाचीच करणी आहे, असे ते मानतात.