प्रतिनिधी/ बेळगाव
बिबटय़ाने दहशत माजवून दहा दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप बिबटय़ा हाताला लागला नाही. किंवा तो कुठे आहे, याचादेखील थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे वनखात्याची डोकेदुखी वाढली असून शहरवासीयदेखील हैराण झाले आहेत. शिवाय बिबटय़ाने दहशत माजविलेल्या परिसरातील शाळांमध्ये 15 ऑगस्टदेखील दहशतीच्या वातावरणातच साजरा करावा लागणार अशी परिस्थिती आहे.
जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एका गवंडय़ावर हल्ला करून बिबटय़ा रेसकोर्स परिसरात दबला आहे. दरम्यान, वनखात्याने शोधासाठी 14 ट्रप कॅमेरे, 6 पिंजरे, 3 ड्रोन कॅमेरे आणि 50 कर्मचाऱयांची यंत्रणा ठेवली आहे. दरम्यान, रात्रंदिवस बिबटय़ाच्या मागावर असूनदेखील वनखाते अपयशी ठरले आहे. बेळगाव येथील बिबटय़ाचा शोध सुरू असतानाच मुडलगी, भुतरामहट्टी आणि मोदग्यात बिबटय़ा आणि तरसाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे जनता भयभीत झाली आहे. केवळ एका आठवडय़ाच्या कालावधीत चार ठिकाणी वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
रेसकोर्स परिसरातील बिबटय़ाला शोधण्यासाठी वनखात्याने सर्व यंत्रणा कामाला जुंपली आहे. मात्र, त्याला म्हणावे तसे यश आले नाही. मागील आठवडय़ात पावसाचा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आता पाऊस कमी झाला असला तरी बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे बिबटय़ा अखेर गेला कुठे, हाच साऱयांना प्रश्न पडला आहे. शिवाय रेसकोर्स परिसरातून बिबटय़ा बाहेर गेला असला तरी तो कॅमेऱयात कैद कसा झाला नाही, असादेखील संशय व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्र अधिक असणाऱया सांगली आणि कोल्हापूर जिल्हय़ात बिबटय़ांची संख्या अधिक आहे. दरम्यान, दरवषी त्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेजारील बेळगाव जिल्हय़ामध्ये बिबटय़ा आढळून येत असल्याचा अंदाजदेखील व्यक्त होत आहे. यापूर्वी कोल्हापूरपासून जवळ असलेल्या येडूरवाडी येथे बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. त्यापाठोपाठ बेळगाव, मुडलगी (धर्मट्टी) या ठिकाणी बिबटय़ा दिसून आला आहे. त्यामुळे तीन ठिकाणी दर्शन झालेला हा बिबटय़ा एकच आहे, की वेगवेगळे आहेत, याबाबतही संभ्रम आहे.
रेसकोर्स परिसरात आसरा घेतलेल्या बिबटय़ामुळे विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, हनुमाननगर, बॉक्साईट रोड, टी. व्ही. सेंटर परिसरात धास्ती कायम आहे. तब्बल दहा दिवसांनंतरही बिबटय़ाचा पत्ता लागला नसल्याने नेमके काय समजावे, असा प्रश्नदेखील स्थानिक रहिवाशांना पडला आहे. दरम्यान, वनखात्याने बिबटय़ा आहे की नाही, याबाबत चित्र स्पष्ट करावे, अशी मागणीही होत आहे.
वनखात्याने साऱया यंत्रणेसह रेसकोर्स आणि परिसरातील 30 एकर क्षेत्र पिंजून काढले आहे. मात्र, बिबटय़ाच्या पाऊलखुणा, वि÷ा आणि इतर कोणतीच बाब हाताला लागली नाही. त्यामुळे हा बिबटय़ा येथून निसटला असावा, असा अंदाजदेखील व्यक्त होत आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री हनुमाननगर डबल रोड मार्गावर संरक्षण भिंतीवरून बिबटय़ा उडी मारून जाताना एका कुटुंबाने पाहिले आहे. याबाबतची माहितीही वनखात्याला दिली आहे. मात्र, वनखात्याने बिबटय़ाबाबतचे अद्याप स्पष्टीकरण दिले नाही.