वार्ताहर /चापगाव
खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार फंडामधून गर्लगुंजी माऊली मंदिर रस्त्यासाठी(पेव्हर्स) तसेच पांडवनगर सी सी रोडसाठी दहा लाख रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्ता कामाचा शुभारंभ नुकताच हाती घेण्यात आला.
या निधीमधून रस्त्याचे काम येत्या माउलीदेवी यात्रा उत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. सदर कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्षा अनुराधा निट्टूरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, ग्रामपंचायत सदस्य परशराम चौगुले, गावातील प्रति÷ित गोपाळराव पाटील, बजरंग दल अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर, ता. पं. माजी सदस्य पांडुरंग सावंत, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य हणमंत मेलगे, अजितराव पाटील, सुरेश मेलगे, राजू सिद्धानी, शांताराम मेलगे, पांडुरंग भातकांडे, प्रमोद पाटील, सोमनाथ यरमाळकर, रेखा कुंभार, वंदना पाटील, अन्नपूर्णा बुरुड, सविता सुतार, ललिता कोलकार, काँट्रक्टर विनोद पाटील, पिडीओ जोतिबा कामकर, बाळू वड्डेबैलकर, यल्लाप्पा व्हळानाचे, शंकर गोरे, भरत गोरे, विठ्ठल पाटील तसेच गावातील नागरिक व युवक उपस्थित होते.