केपीटीसीएलकडून निविदा काढण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी /बेळगाव
मच्छे येथील 220 केव्ही विद्युत स्टेशनला सर्व परवानग्या मिळाल्या असून पुढील आठवडय़ात निविदा काढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे बेळगावमध्ये दुसऱया 220 केव्ही स्टेशन उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. केपीटीसीएलकडून निविदा काढण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
बेळगाव शहर व तालुक्मयातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी केपीटीसीएलकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शहराच्या उत्तर भागात हिंडाल्को येथे 220 केव्ही स्टेशन आहे. धारवाड येथील नरेंद्र स्टेशनमधून थेट या स्टेशनमध्ये वीजपुरवठा केला जातो. तेथून बेळगाव शहरासह तालुक्मयात वीजपुरवठा होतो. परंतु बऱयाचवेळा या स्टेशनमध्ये बिघाड झाल्यास शहरासह तालुका अंधारात जात होता. अनेकवेळा अशी परिस्थिती जाणवल्याने शहराला आणखी एका विद्युत स्टेशनची गरज भासत होती.
शहराच्या उत्तर भागात एक स्टेशन असल्याने शहराच्या दक्षिण भागात एक स्टेशन असावे, यासाठी जागेची चाचपणी सुरू होती. प्रारंभी देसूर परिसरात सरकारी जागेची पाहणी करण्यात आली. परंतु आवश्यक इतकी जागा उपलब्ध न झाल्याने यरमाळ येथील जागा निश्चित करण्यात आली. ही जागा खासगी मालकीची असल्यामुळे बऱयाच तांत्रिक अडचणी येत होत्या. अखेर व्हीटीयूसमोरील हेस्कॉमच्या स्टेशनमध्येच नवीन स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
व्हीटीयूसमोर पूर्वी 110 केव्ही स्टेशन होते. त्यालाच आता 220 केव्ही स्टेशन केले जाणार आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी या स्टेशनला केपीटीसीएलकडून अंतिम मंजुरी मिळाली. त्यानंतर निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. येत्या 15 दिवसांत निविदा काढल्या जाणार असून, त्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.