Tennis Ball Cricket Sindhudurg Premier League organized in Malvan
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी टेनिस क्रिकेट क्लब आयोजित ४५ वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग (SPL) 2022 स्पर्धेचे आयोजन मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंड येथे 31 डिसेम्बर आणि 1 जानेवारी या दोन दिवशी करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक २७/११/२०२२ आहे.
साखळी पद्धतीने खेळविण्यात येणाऱ्या या सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक जिल्ह्यातील 45 वर्षांवरील खेळाडूंनी मालवण तालुका अध्यक्ष रिझवान शेख (भ्रमण ध्वनी क्र. 9421145786) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण तालुका टेनिस हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
मालवण / प्रतिनिधी