Tarun Bharat

फ्लेक्सवरून शिमोग्यात तणाव

Advertisements

एकावर चाकूहल्ला ः तिघांना अटक ः शहरात तीन दिवस जमावबंदी-कडेकोट पोलीस बंदोबस्त

प्रतिनिधी/ बेंगळूर

स्वातंत्र्यदिनी शिमोग्यात दोन गटांमध्ये फ्लेक्सवरून वाद निर्माण झाला असून या घटनेत एकावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाल्याने शिमोग्यात जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी चाकूहल्ला करणाऱया आरोपीला गोळीबार करून पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.

शिमोग्यात अमीर अहमद सर्कलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फ्लेक्स लावण्यात आला होता. यावर टिपू सुलतान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन तो हटविण्याचा प्रयत्न केला. तसेच टिपू सुलतानचा फ्लेक्स लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन गटात वाद उफाळून आल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. टिपू सुलतान संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनाचे खंडन करून हिंदुत्ववादी संघटनांनी धरणे आंदोलन छेडले. यावेळी जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. शहरात तणावाचे वातावरण असतानाच उप्पारकेरी कॉलनीमध्ये प्रेमसिंग याच्यावर चाकूहल्ला झाला. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाल्याने सोमवारपासून तीन दिवस जमावबंदीचा आदेश देण्यात आला. तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिमोगा आणि भद्रावती येथील शाळा-महाविद्यालयांना एक दिवसाची सुटी देण्यात आली होती.

जमावबंदी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त असून मंगळवारी पोलिसांनी शहरात पथसंचलन करून सतर्कतेचा इशारा दिला. तरी देखील याच जिल्हय़ातील भद्रावती या शहरात दोन गटात वादावादी झाली. यावेळी सुनील या कार्यकर्त्याला मारहाण झाली. त्याच्यावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न झाला. यात तो किरकोळ जखमी झाला असून भदावती तालुका इस्पितळात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

गोळीबार करून आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिमोग्यात प्रेमसिंग याच्यावरील चाकूहल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी मोहम्मद जबी उर्फ चर्बी (वय 30) फरारी झाला होता. मंगळवारी सकाळी तीर्थहळ्ळी रोडवरील एका समुदाय भवनजवळ आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यामुळे त्याला पकडणाऱयासाठी विनोबानगर स्थानकाच्या पोलिसांचे एक पथक तेथे गेले. यावेळी मोहम्मद जबीने पोलिसांवर हल्ला करून निसटण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीएसआय मंजुनाथ यांनी स्वसंरक्षणार्थ मोहम्मदच्या पायावर गोळी झाडली. मोहम्मदवर शिमोग्याच्या मेग्गॉन इस्पितळात उपचार सुरू आहेत. चाकूहल्ला प्रकरणात नदीम आणि अब्दुल रेहमान यांना सोमवारीच अटक करण्यात आली आहे.

अलीकडेच राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद, कायदा-सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार, शिमोगा जिल्हा पोलीसप्रमुख लक्षीप्रसाद यांच्याशी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी चर्चा केली आहे.

हल्लेखोरांची मालमत्ता जप्त करणार?

शिमोग्यात फ्लेक्सच्या मुद्दय़ावरून प्रेमसिंग याच्यावर चाकूहल्ला केलेल्या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याबाबत राज्य सरकार गंभीरपणे विचार करीत आहे.  त्यामुळे राज्यातही उत्तर प्रदेशच्या धर्तीवर दंगली माजविणाऱयावर कठोर कारवाई करण्यास राज्य सरकार सरसावले आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी या प्रकरणासंबंधी अधिक प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहेत. पोलीस त्यांचे काम करतील, असे सांगितले आहे.

Related Stories

धक्कादायक ! बलात्कार करणाऱ्यासोबतच दोरीने बांधून काढली पीडितेची धिंड

Abhijeet Shinde

‘मदरसा’ या शब्दाचं अस्तित्व आता संपुष्टात यायला हवं

datta jadhav

बिहारमध्ये सापडले सर्वात मोठे सुवर्णभांडार

Patil_p

संस्कृत आणि तमिळ वाद व्यर्थ; सोडवण्यासाठी इतर अनेक मुद्दे- सोनु निगम

Abhijeet Khandekar

100 मुलांच्या मृत्यूने गेहलोत संकटात

Patil_p

चीनमध्ये विमान कोसळून 133 ठार ?

Patil_p
error: Content is protected !!