Tarun Bharat

व्हॅक्सिन डेपो येथे झाडे तोडल्याने तणाव

Advertisements

न्यायालयाचा अवमान करत कामाला सुरुवात ः पर्यावरणप्रेमींसह नागरिकांतून संताप

प्रतिनिधी/ बेळगाव

व्हॅक्सिन डेपो येथे विविध विकासकामे राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने झाडाला हात न लावता विकास करण्यास मुभा दिली आहे. मात्र चक्क झाडे तोडून पुन्हा कामाला सुरुवात केल्यामुळे पर्यावरण प्रेमींतून तसेच नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी व्हॅक्सिन डेपो येथे बरीच वादावादी झाली.

व्हॅक्सिन डेपो हा बेळगावचा ऑक्सिजन पुरवठा करणारा विभाग आहे. त्यामुळेच बेळगावकरांना ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे तेथील झाडे तसेच इतर वनस्पतींचे संरक्षण करावे, यासाठी पर्यावरणप्रेमी नेहमीच झटत आहेत. मात्र विकासाच्या नावाखाली भकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयामध्ये स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाची दिशाभूल करून ही स्थगिती उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

न्यायालयाने स्थगिती उठविताना कोणत्याही परिस्थितीत झाडांना हात न लावता विकास करा, असे सांगितले होते. मात्र झाडांची कत्तल झाल्यामुळे आता हा न्यायालयाचाच अवमान आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ऍड. किरण कुलकर्णी, ऍड. सतीश बिरादार यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले. त्यानंतर कंत्राटदाराला धारेवर धरण्यात आले. त्यामुळे कंत्राटदाराने आम्हाला परवानगी मिळाली आहे, अशी थातूरमातूर उत्तरे दिली. यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनाही याबद्दल जाब विचारण्यात आला. तेंव्हा त्यांनी वाहतुकीला अडथळा होत असल्यामुळे आम्ही ही झाडे तोडली, असे सांगितले. रहदारी पोलिसांनी आम्हाला अर्ज दिला आहे. त्यामुळे आम्ही ही झाडे तोडल्याचे सांगून त्यांनी न्यायालयाचा अवमानच केला आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लवकरच अवमान याचिका दाखल करणार

सर्वोच्च व उच्च न्यायालयाने झाडे तोडू नये, असा आदेश दिला आहे. मात्र ही झाडे तोडण्यात आली आहेत. चार झाडे तोडली गेली आहेत. त्याबद्दल आता लवकरच आम्ही अवमान याचिका दाखल करणार असल्याचे ऍड. किरण कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

Related Stories

हेमु कलानी चौकात कचरा

Patil_p

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱयांची बैठक

Amit Kulkarni

अखेर बसस्थानकाचा ताबा कॅन्टोन्मेंटकडे

Amit Kulkarni

अहंकार बाजूला सारून प्रेमाने जगा

Amit Kulkarni

भास्कर्स ‘मने होळीगे कुरूक तिंडी’चे उद्घाटन

Amit Kulkarni

रेडि टू इट उत्पादनांवर टाटाचा जोर

Patil_p
error: Content is protected !!