प्रतिनिधी/ बेंगळूर
बारावीपाठोपाठ 2022-23 या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वार्षिक परीक्षेचे तात्कालिक वेळापत्रक शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. एसएसएलसी परीक्षा मंडळाने हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी आणि पालकांना यावर आक्षेप नोंदविण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तात्कालिक वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 1 ते 15 एप्रिल या कालावधीत होईल.
परीक्षेचे वेळापत्रक….
1 एप्रिल – प्रथम भाषा
4 एप्रिल – गणित
6 एप्रिल – द्वितीय भाषा
10 एप्रिल – विज्ञान
12 एप्रिल – तृतीय भाषा
15 एप्रिल – समाज