ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Three trucks accident on Mumbai-Pune Expressway मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरगाव घाटात आज पहाटेच्या सुमारास तीन ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातादरम्यान, एक ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला. तर दुसऱ्या ट्रकची केबिन ट्रकपासून वेगळी झाली. दरीत कोसळलेल्या ट्रकच्या चालकाला केबिनमधून सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर एका प्रवाशाचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात आज पहाटे चारच्या सुमारास मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर तीन ट्रकची एकमेकांना जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, एक मोठा ट्रक रस्त्यावरुन 100 फूट खोल दरीत कोसळला. तर दुसऱ्या ट्रकची केबिन ट्रकपासून वेगळी होऊन ती देखील दरीत कोसळली. तर तिसरा ट्रक महामार्गावरच पलटी झाला. या अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने महामार्ग पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे.
अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.