Tarun Bharat

गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात

रायबाग – रायबागच्या गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील प्रवास करत असलेल्या कारचा अचानक टायर फुटला त्यामुळे कार पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रायबाग तालुक्यातील हुब्बरवाडी मंगसुळी -लक्ष्मेश्वर महामार्गावर घडली. एअरबॅग सुटल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी कार उलटली. त्यामधे प्रवास करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी दुसऱ्या वाहनातून बेळगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ते त्यांच्या कार्यालयातून हुक्केरी येथे जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

चांदीपासून बनविली राम मंदिराची प्रतिकृती

Patil_p

हेस्कॉमकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव

Patil_p

प्रशासकीय काळात ग्रा.पं.सदस्यांची गरज नाही

Omkar B

छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी गांभीर्याने

Amit Kulkarni

अमृतधन-धनसागर योजनांसाठी केवळ 15 दिवसांचा अवधी शिल्लक

Amit Kulkarni

नवीन आर्थिक वर्षात लोकमान्य सुवर्ण अंकुर योजनेस प्रारंभ

Amit Kulkarni