तिरुचिरापल्ली येथे घडली दुर्घटना
वृत्तसंस्था/ तिरुचिरापल्ली
तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्हय़ात रविवारी पहाटे मिनिव्हॅन एका लॉरीला धडकल्याने एका मुलासमवेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेवेळी वाहनातून एकूण 9 जण प्रवास करत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत बचावमोहीम राबविली आहे.
तिरुवासीनजीक त्रिची-सालेम राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे मिनिव्हॅन लॉरीला धडकल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक मूल तसेच महिलेसह 6 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना त्रिची येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुजीत कुमार यांनी दिली आहे.