Tarun Bharat

श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद- तुषार गांधी

कोल्हापूर प्रतिनिधी

महात्मा गांधी यांचे नातु आणि विचारवंत तुषार गांधी यांनी आज केंद्र सरकारवर सडकून टीका केली. श्रीरामाच्या नावावर देशांमध्ये आतंकवाद पसरवला जात आहे, श्रीरामाचे नाव घेऊन लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. हिंदूंराज्य आले पाहिजे अशी केंद्र सरकारची रणनीती असून याच्या सर्व हालचाली दिल्ली आणि नागपुर वरून चालतात असा आरोप करून त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशामध्ये अस्वस्थता पसरली आहे. 1942 साली सामान्यांच्या मुक्तीसाठी जसा लढा उभारला होता तसाचं लढा पुन्हा उभारून जनक्रांती आणण्याची गरज असल्याचे गांधी यांनी नमूद केलं. तसेच देशांत एकच सरकार असल्यामुळे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. देश सध्या हुकुमशाहीच्या दिशेने जात आहे. याला कुठेतरी थांबवणे गरजेचे असून सर्वांनी एकत्रित येऊन ही चळवळ उभी केली पाहिजे.

पुढे बोलताना गांधी म्हणाले, “तिरंगा माझ्या मनात आहे. मी देशवासियांचे कौतुक करतो. हर घर तिरंगा राबवून सरकारने सिद्ध केले नाही. देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करत असताना ध्वजाची अवस्था सध्या काय झाली हे पाहीले पाहिजे” राष्ट्रप्रेम हें स्वतःच्या हृदयात असणे हें अधिक गरजेचे असल्याचे गांधी यांनी सांगितले.

Related Stories

विकेंड लॉकडाऊनमध्ये पर्यटनासाठी निघालेल्यांची पोलीस चौकीतच स्वॅब तपासणी

Archana Banage

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मांना मुंबई पोलिसांचे समन्स

Archana Banage

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनकडून राज्यमंत्री यड्रावकरांचा सन्मान

Archana Banage

रेमडेसिवीरची टंचाई कायम, मागणी अडीच हजारची, पुरवठा अडीचशेचा

Archana Banage

महावितरणच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यास मारहाण

Archana Banage

जनता दलाचा सतेज पाटील यांना बिनशर्त पाठींबा

Abhijeet Khandekar