Tarun Bharat

डोडात चिनी शस्त्रासह दहशतवादी अटकेत

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. फरीद अहमद असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो डोडामधील रहिवाशी आहे. त्याच्याकडून चिनी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझिन आणि 14 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार रविवारी पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने डोडा शहराबाहेर फरीद अहमदला पकडले. फरीद अहमद सीमेपलीकडे राहणाऱ्या दहशतवादी कमांडरच्या संपर्कात होता. मार्चच्या सुरूवातीला त्याला सीमेपलीकडून शस्त्रे मिळाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. 21 जून रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येत तो सामील होता.

फरीद अहमद हा कट्टरपंथी होता. तो काश्मीर खोऱ्यातील तरुणांना दहशतवादी संघटनांसाठी काम करण्यासही प्रवृत्त करत होता. त्याच्याविरोधात डोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱया आरोपीला अटक

sachin_m

आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडी

Abhijeet Shinde

आसाम : करीमगंजमधील मतदान केंद्रावर पुन्हा मतदान

datta jadhav

पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ

Patil_p

नेपाळशी चर्चेने वाद मिटवू

Patil_p

6 ते 6.5 टक्के दराने देशाचा आर्थिक विकास

Patil_p
error: Content is protected !!