किरकुक शहरानजीकचा तपासणी नाका लक्ष्य
वृत्तसंस्था/ किरकुक
इराकच्या किरकुक शहरात दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 4 सैनिक हुतात्मा झाले आहेत. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. किरकुक शहरानजीकच्या तपासणी नाक्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी सैनिकांकडील शस्त्रास्त्रs तसेच संपर्काची उपकरणे पळविली आहेत. 10 महिन्यांपूर्वी म्हणजेच जानेवारीमध्ये दहशतवाद्यांनी अशाच प्रकारचा हल्ला केला होता. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी तेव्हा कूबा शहरातील सैन्याच्या छावणीला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 11 सैनिकांचा मृत्यू झाला होता. इस्लामिक स्टेटचे स्लीपर सेल्स इराकच्या सुरक्षा दलांना सातत्याने लक्ष्य करत आहेत.