नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स पुन्हा सक्रीय : पाकिस्तानकडून तोफा तैनात
वृत्तसंस्था / श्रीनगर
पाकिस्तानकडून काश्मीर खोऱयातील नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स पुन्हा सक्रीय करण्यात आले आहेत. सध्या या लाँच पॅड्सवर 60-80 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. हे अफगाणिस्तानातून परतलेले दहशतवादी असल्याचे मानले जातेय. पाकिस्तान उन्हाळय़ादरम्यान या दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
2019 मध्ये भारतीय सैन्याने कठोर भूमिका घेतल्यावर पाकिस्तान या लाँच पॅड्सपासून दूर राहिला होता. त्यानंतर काही काळासाठी हे लाँच पॅड्स सक्रीय झाले आणि पुन्हा नंतर तेथील हालचाली बंद झाल्या होत्या. परंतु गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी ऑगस्टपासून पुन्हा सपीय झालेल्या या लाँच पॅड्सवर 60-80 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत.
अफगाणिस्तानातील युद्धातून परतलेले हे पाकिस्तानी दहशतवादी असू शकतात. नियंत्रण रेषेवर मागील वर्षापासून युद्धविराम असून पाकिस्तानी सैन्याने 2019 पासून आतापर्यंत सुमारे 8 हजार टन संरक्षण सामग्री जमविल्याचे समजते. पाकिस्तानी सैन्याने सीमेवर 60 हेवी कॅलिबर तोफा तैनात केल्या आहेत.
पाकिस्तानकडून होणाऱया संभाव्य कारवाया पाहता भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर विशेष सतर्कता बाळगली आहे. दहशतवाद्यांकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्याच्या दृष्टीने सैन्याने उचलली आहेत.