Tarun Bharat

शोपियां चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

errorist killed in Shopian encounter जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.

शोपियां जिह्यातील बास्कुचन भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली. बास्कुचन भागाला सुरक्षा दलाचा वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला.

अधिक वाचा : ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी गोळे यांचे निधन

नसीर अहमद भट असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो नौपोरा बास्कुचन शोपियांचा रहिवासी होता आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित होता. पोलिसांनी त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा एके 47 रायफल्ससह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे.

Related Stories

उत्तर भारत गारठणार

Archana Banage

पंतप्रधान बिहारमध्ये 12 प्रचारसभा घेणार

Patil_p

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

रामजन्मभूमी विश्वस्त संस्थेची स्थापना

Patil_p

समाजवादी पक्ष युतीला 400 हून अधिक जागा !

Patil_p

नक्षली हल्ल्यात 17 जवान हुतात्मा

tarunbharat
error: Content is protected !!