4 दहशतवाद्यांना कंठस्नान ः काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱयाचा खात्मा
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपोरा येथे सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुख्तार भट देखील सामील आहे. मुख्तार भट हा काश्मीर खोऱयातील काश्मिरी पंडित तसेच परप्रांतीय कामगारांवर हल्ले करत होता. त्याच्यासोबत पुलवामा येथील सकलैन मुश्ताक तसेच पाकिस्तानी दहशतवादी मुश्फिक देखील मारला गेला आहे. तसेच अनंतनाग येथील बिजबेहरा येथे एका दहशतवाद्याला ठार करण्यास सुरक्षा दलांना यश मिळाले आहे.
पुलवामा येथे मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आली आहेत. हे दहशतवादी सुरक्षा दलांच्या तळावर आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत होते असे मानले जात आहे.
मुख्तार अहमद भट हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेजिस्टन्स प्रंटचा कमांडर होता. पुलवामा परिसरातील दहतशवादी कृत्यांमध्ये त्याचा सहभाग होता. तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहतशवादात सामील होण्यासाठी तो प्रवृत्त करत होता.
अवंतीपोरा येथे काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा दलांसोबत मिळून शोधमोहीम हाती घेतली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत 3 दहशतवादी मारले गेले आहेत.
तत्पूर्वी अनंतनाग येथील बिजबेहरामध्ये एका दहशतवाद्याने सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. तर सुरक्षा दलांच्या कारवाईत तो मारला गेला आहे. अशाप्रकारे 1 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दोन चकमकींमध्ये 4 दहशतवादी मारले गेले आहेत.
3 हायब्रिड दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी हरनामबल येथे 3 हायब्रिड दहशतवाद्यांना अटक केली होती. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांकडून 10 किलो बकेट आयईडी आणि 2 ग्रेनेड हस्तगत केले आहेत. बॉम्बविरोधी पथकाने रंगरेथ येथे आयईडी नष्ट केला आहे.
4 दहशतवाद्यांना कंठस्नान ः काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱयाचा खात्मा