Tarun Bharat

दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

Advertisements

वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरण – 2006 मधील घटनेत 18 जणांचा मृत्यू

गाझियाबाद / वृत्तसंस्था

वाराणसीत 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादी वलीउल्लाह खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गाझियाबाद न्यायालयाने वलीउल्लाहला बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. 16 वर्षांपूर्वी वाराणसी येथे साखळी बॉम्बस्फोट झाला होता. यात 20 जणांचा मृत्यू झाला होता. तर शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

वाराणसीमधील संकटमोचन आणि कैंट (छावणी) स्टेशनवर 7 मार्च 2006 रोजी तीन साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात वलीउल्लाह याचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले होते. दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयात त्याच्याविरोधात खटला सुरू होता. वाराणसी येथे 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दोषी ठरलेल्या दहशतवादी वलीउल्लाहच्या शिक्षेवर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. शिक्षेच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी आपापली बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. स्फोटाच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने दहशतवादी वलीउल्लाहला खून, हत्येचा प्रयत्न, दुखापत आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. निकाल देताना न्यायालयाने वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावली. 

जिल्हा सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत नोंदवलेल्या दोन गुह्यांमध्ये वलीउल्लाह याला दोषी ठरवले. निकालाच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली नव्हती. शिवाय न्यायालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्वान पथकाकडून न्यायालयाच्या आवारात वेळोवेळी झडती घेण्यात येत होती. बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथकही घटनास्थळी हजर होते. तसेच न्यायालयाकडे जाणारे तिन्ही बाजूंचे रस्ते बंद करून एकच मार्ग सुरू ठेवण्यात आला होता. सुरक्षा तपासणी केल्यानंतरच न्यायालयात प्रवेश दिला जात होता. या खटल्याशी संबंधित वकिलांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वकिलाला जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, वाराणसीतील बॉम्बस्फोटानंतर वलीउल्लाहच्या बाजूने कोणताही वकील खटला लढण्यास तयार नव्हता. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण गाझियाबाद न्यायालयात वर्ग करण्यात आले. पोलिसांच्या तपासात या तीन बॉम्बस्फोटात पाच दहशतवाद्यांचा हात असल्याचे निष्पन्न झाले. यातील एक दहशतवादी मौलाना झुबेर याचा सीमेवर सुरक्षा दलांनी खात्मा केला होता.

Related Stories

राहुल गांधींनी घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन

Amit Kulkarni

भारतात मागील 24 तासात 47,704 नवे कोरोना रुग्ण, 654 मृत्यू

datta jadhav

कोरोनामुळे जीव गमाविणाऱया पत्रकारांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत

Patil_p

चार धाम मार्गरुंदीकरणास मान्यता

Patil_p

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीचा घोळ कायम

Patil_p

बँक भरती परीक्षा आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये

Amit Kulkarni
error: Content is protected !!