Tarun Bharat

पृथ्वीला वाचविण्याचे परीक्षण यशस्वी

Advertisements

लघुग्रहाला धडकले अंतराळयान ः नासाने रचला इतिहास

वृत्तसंस्था / ह्युस्टन

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळवारी इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच एखादी प्लॅनेटरी डिफेन्स टेस्ट म्हणजेच डार्ट मिशन यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. भविष्यात पृथ्वीला एखाद्या लघुग्रहाची धडक होण्याची भीती निर्माण झाल्यास नासाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे पृथ्वीला वाचविता येणार आहे. भविष्यात पृथ्वीला सर्वाधिक धोका हा लघ़ुग्रहापासूनच आहे.

डार्ट मिशनने 27 सप्टेंबर रोजी पहाटे 4.45 वाजता लघ़ुग्रह डिडिमोसच्या चंद्रासारख्या डायमॉरफोसला धडक दिली. यामुळे या मोहिमेचा उद्देश पूर्ण झाला आहे. अंतराळयानाने लघुग्रहाला धडक देत डायमॉरफोसची दिशा बदलली आहे. अंतराळात पृथ्वीपासून 1.1 कोटी किलोमीटर अंतरावर नासाच्या अंतराळयानाने लघुग्रहाला धडक दिली आहे.

डार्ट मिशनच्या अंतराळयानाने सुमारे 22,530 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने डायमॉरफोसला धडक दिली होती. धडक देण्यापूर्वी डार्ट मिशनने डायमॉरफोस आणि डिडिमोस लघुग्रहाचे वातावरण अन् संरचनेची माहिती मिळविली होती. या मोहिमेकरिता कायनेटिक इम्पॅक्टर टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. या मोहिमेचा उद्देश लघुग्रहाला नष्ट करणे नव्हे तर त्याची दिशा बदलणे होता असे नासाकडून सांगण्यात आले.

डिडिमोस लघुग्रहाचा व्यास 2600 फूट इतका आहे. डायमॉरफोस याला प्रदक्षिणा घालत असतो आणि त्याचा व्यास 525 फूट आहे. धडकेनंतर दोघांची दिशा आणि वेगात झालेल्या बदलांचे अध्ययन केले जात आहे. नासाने पृथ्वीच्या चहुबाजूला 8 हजारांहून अधिक नीयर-अर्थ ऑब्जेक्ट्सची (एनईओ) ओळख पटविली आहे. हे एनईओ पृथ्वीला धोका पोहोचवू शकतात. यातील काही एनईओंचा व्यास 460 फुटांपेक्षा अधिक आहे. यातील एकही एनईओ पृथ्वीवर आदळल्यास अमेरिकेतील एक प्रांताइतक्या भूभागाला उद्ध्वस्त करू शकतो. तर समुद्रात एनईओचे अवशेष कोसळल्यास 2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीपेक्षा कितीतरी अधिक पट तीव्र त्सुनामी निर्माण होऊ शकते. ग्रीक भाषेत डिडिमॉसचा अर्थ जुळे तर डायमॉरफोसचा अर्थ ‘दोन रुपे’ असा होतो.  

अंतराळयानाचा आकार

डार्ट मिशन अंतराळयानाची लांबी 19 मीटर इतकी होती. म्हणजेच एका सामान्य बसपेक्षा 5 मीटरने अधिक. तर अंतराळयान ज्या लघुग्रहाला धडकले, तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा आकाराने जवळपास दुप्पट मोठा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची उंची 93 मीटर आहे. तर डायमॉरफोस 163 मीटरचा आहे. म्हणजेच फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठा त्याचा आकार आहे.

Related Stories

तरुण रुग्णांमधील मृत्यूचे मुख्य कारण ‘स्टॉर्म’

Patil_p

कृष्णविवराचे अंतरंग

Patil_p

बांग्लादेशात कोरोनाचा उद्रेक : 5 एप्रिलपासून पुढील 7 दिवस पूर्ण लॉकडाऊन

Tousif Mujawar

अमेरिकेत मृत्यूतांडव; 24 तासात कोरोनाचे 2494 बळी

prashant_c

दोन भारतीय मच्छीमार नौकेवरील १६ खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात, ७ जण पालघरमधील

Archana Banage

अफगाणिस्तानात पोहोचली पहिली कमर्शियल फ्लाइट

Patil_p
error: Content is protected !!