Tarun Bharat

TET घोटाळा : अश्विन कुमारच्या घरातून 2 किलो सोने, 25 किलो चांदी जप्त

ऑनलाईन टीम / मुंबई :

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी बेंगळूरमधून अटक केलेल्या अश्विन कुमारच्या घरातून 2 किलो सोने, 25 किलो चांदी आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत.

टीईटी परीक्षा घोटाळ्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आजी-माजी आयुक्तांना अटक करण्यात आली. त्यानंतर याचे धागेदोरे थेट बेंगळूर येथील अश्विन कुमारपर्यंत पोहोचले होते. अश्विन कुमार हा जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक असून, तो प्रितीश देशमुख याच्यासोबत काम करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी त्याच्या बेंगळूर येथील निवासस्थानी दाखल झाले. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करुन 2 किलो सोने, 25 किलो चांदी आणि हिरे असा लाखेंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि परीक्षा परिषेदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच आहे. तुकाराम सुपेच्या मित्राकडून सुपेचे आणखी 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. 24 तासात सुपेचे 63 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सुपेचे एकूण 3 कोटी 93 लाखांचे घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे.

Related Stories

नित्रळ धरणग्रस्त गावाने घेतलेली भरारी अभिमानस्पद

Patil_p

सिद्धनाथवाडीत दोन दुचाकी चोरटे जेरबंद

Patil_p

ट्रक्टरच्या धडकेत बालिका ठार

Amit Kulkarni

आदर्श शिक्षक पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

datta jadhav

सातारा जिल्हा काँग्रेस कोविड मदत व सहाय्य केंद्राचे सोमवारी उद्घाटन – डॉ. सुरेशराव जाधव

Archana Banage

मान्सूनपूर्व पावसाने साताऱयाला झोडपले

Patil_p