Tarun Bharat

TET परीक्षा घोटाळाप्रकरणी IAS खोडवेकर यांना अटक

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

टीईटी परीक्षा घोटाळय़ाप्रकरणी आएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली असून, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

खोडवेकर हे 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत शिक्षण विभागात कार्यरत होते. सध्या ते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या उपसचिव पदी कार्यरत आहेत. टीईटी घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचे पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तपासात समोर आणले. त्यानंतर खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली. खोडवेकर यांना थोडय़ाच वेळात शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर आणि प्रितीश देशमुख यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळय़ाप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांनी 2019-20 च्या परीक्षा निकालांमध्ये फेरफार केली आहे. 7880 अपात्र परीक्षार्थींचे मार्क वाढवून त्यांना पात्र ठरवलं आहे. खोडवकेर हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Related Stories

वादग्रस्त ट्विट करत राऊतांचा भाजपवर निशाणा

Sumit Tambekar

चौदा जिल्हे रेड झोनमध्ये, कडक लॉकडाऊन गरजेचा : विजय वडेट्टीवार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : रुईत पूरग्रस्त चिमणी-पाखरांना मिळालं जीवदान

Abhijeet Shinde

पावसाचे पाणी खासदारांच्या घरातही घुसले

Patil_p

आसारामबापूंच्या ५ हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

datta jadhav

तिलारी रामघाटात कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!