वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती; मिल पुनर्जीवित करण्यास परवानगी
कोल्हापूर, मुंबई- प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या कल्पक दूरदृष्टीतून साकारलेल्या श्री शाहू मिल पुनर्जीवित करून ती सुरू करण्यात येणार असून मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना ऐकू येणार असल्याचे वस्त्राsद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
मंत्री पाटील म्हणाले, शाहू मिल पुन्हा सुरू करून भोंगा सुरू करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू स्मृती व विचार जतन समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन व अटींची पूर्तता करून ही मिल पुनर्जीवित करून भोंगा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
यामध्ये भोंगा वाजविण्याकरिता घ्यावा लागणाऱया शासकीय परवानग्यांच्या अधिन राहून प्रथम 6 महिन्यांसाठी महामंडळाची हरकत नाही. तसेच मिलच्या आवारात भोंगा योग्य ठिकाणी बसवण्यासाठी आणि संपूर्ण तांत्रिक बांबीची पूर्तता करण्यासाठी लागणाऱया खर्चाची जबाबदारी सदर समितीची राहील. या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करून ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.