मालवणात तणावपूर्ण वातावरण
मालवण । प्रतिनिधी
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आज महाविकास आघाडीचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले . यावेळी ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . राजकोट किल्ल्यावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . आदित्य ठाकरे , खा . नारायण राणे , जयंत पाटील या बड्या नेत्यांसह भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .