Tarun Bharat

तुरुंगातून बाहेर आल्यापेक्षा अमोल किर्तीकर सोबत असल्याचा जास्त आनंद- संजय राऊत

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदेंसोबत गेल्यानंतर त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. अमोल कीर्तिकर यांनी आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. यावेळी राऊत यांनी अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची निवड केल्याने राऊतांनी आनंद व्यक्त केला. तसेच अमोल कीर्तिकरांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी ‘मला १०० दिवसानंतर तरुंगातून बाहेर आल्यानंतर जितका आनंद झाला नव्हता, तितका आनंद आज मला अमोल भेटायला आल्यानंतर झाला आहे’, असे वक्तव्य केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. तसेच, अमोल कीर्तिकर यांनही आपण कायम ठाकरे गटासोबत राहणार असल्याचे सांगितले.

पुढे राऊतांनी म्हटलं आहे की, अमोल किर्तीकर हे आदित्य ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात सोबत असलेले कडवट शिवसैनिक आहेत आणि ते शिवसेनेबरोबरच आहेत. वडील गजानन किर्तीकरांच्या निर्णयामध्ये अमोल सहभागी नाहीत. अमोल किर्तीकर मूळ शिवसेनेसोबत आहेत. याचा आम्हांला सर्वांना आनंद आहे. अमोल किर्तीकर यांनी राऊतांची भेट घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रपणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“यापुढे अमोल कीर्तिकर यांच्यासारख्या तरुणपिढीकडून शिवसेना पुढे जात आहे. आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. उद्धव ठाकरेही सर्वत्र दौरे करत आहेत. सध्या महाराष्ट्राचे राजकारण इतके अस्थिर झाले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार, मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे”, असेही राऊत यांनी म्हटले.

या भेटीनंतर अमोल कीर्तिकर यांनीही माध्यमांशी संवाद साधला. “मी आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. यापुढेही त्यांच्यासोबतच काम करत राहीन. बऱ्याचा कालावधीनंतर संजय राऊत यांची भेट घेतली. गजानन कीर्तिकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. माझा निर्णय त्यानाही सांगितला. तसेच, शिवसेना वाढवण्यासाठी माझ्यावर जी काही जबाबदारी पडेल ती मी योग्यरित्या पार पाडणार आहे”, असे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले.

Related Stories

कोल्हापुरात आणखी एक कोरोनाग्रस्त; त्या तरुणाच्या संपर्कातील महिलेला बाधा

Archana Banage

उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’चा कायदा आणा : चित्रा वाघ

Kalyani Amanagi

5 फेब्रुवारीला होणाऱ्या हिंदू- जन आक्रोश सभेचे चित्रिकरण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Abhijeet Khandekar

महिलांवरील अत्याचार, बंद मंदिरांच्या विरोधात भाजपचे महाराष्ट्रात आंदोलन

Tousif Mujawar

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सदनिका अर्ज नोंदणीचा शुभारंभ

Tousif Mujawar

महाविकास आघाडीचा मी गुलाम नाही,चुकणार तिथं बोलणार – राजू शेट्टी

Archana Banage