महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालाची सुनावणी दिल्लीमध्ये निवडणुक आयोगासमोर आज सुरू असून या निकालाकडे महाराष्ट्राशिवाय संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहीले आहे. या सुनावणीसाठी शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांच्याबरोबर निहार ठाकरे (Nihar Thakre) हे उपस्थित असून ठाकरे गटाकडून कडून कपिल सिब्बल (Kapil Sibbal) हे निवडणुक आयोगासमोर उपस्थित राहीले आहेत.
यावेळी प्रथम ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. यामध्ये त्यांनी राष्ट्रिय कार्यकारिणीला मुदतवाढ मागितली आहे. याशिवाय मुदतवाढ शक्य नसेल तर राष्ट्रिय़ कार्यकारणीच्या मिवडणुका घेण्यास परवानगी द्यावी अशीही मागणी केली आहे.
यावेळी युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी ही घटना ही घटना संसदीय व्यवस्थेची थट्टा असल्याचे म्हटले आहे. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटना निवडणुक आयोगासमोर सादर केली. तसेच शिवसेनेच्या घटनेशी तंतोतंत जुळणारी फक्त ठाकरे गटाची कार्यकारिणी आहे. असे त्यांनी दावा केला आहे. ठाकरे गटाची राष्ट्रिय़ कार्यकारणी कधीच बरखास्त होऊ शकत नाही.निवडणुक आयोगाने शिंदे गटाची शपथपत्रे आणि इतर कागदपत्रे तपासून पहावीत अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
तसेच शिवसेना पक्षाची घटना शिंदे यांना मान्य नसेल तर शिंदे यांचे पक्षनेतेपद कसे पद ग्राह्य कसे धरता येईल असाही युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपल्यानंतर ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी शिवसेनेची मुळ प्रातिनिधीक सभा बरखास्त होऊ शकत नाही असा युक्तीवाद केला.
ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी याच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली पहायला मिळाली. महेश जेठमलानी यांनी कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या मुद्यावर आक्षेप घेऊन जोरदार विऱोध केला.
त्यानंतर शिंदे गटाकडून बाजू मांडताना वकिल महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला. यावेळी सुरवातीलाच देवदत्त कामत यांनी महेश जेठमलानी यांच्या युक्तीवादावर आक्षेप घेतला. आणि याचिकेला अनुसरून युक्तीवाद केला जावा अशी मागणी केली. त्यावर जठमलानी यांनी मी माझ्या पद्धतीने युक्तीवाद करणार असा आग्रह घरला. दोन्ही वकिलांमध्ये झालेल्या या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण काही काळ तणावपुर्ण बनले होते.