Tarun Bharat

‘ठकसेन’ पीएमओ अधिकाऱ्याच्या काश्मीरमध्ये आवळल्या मुसक्या

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या एका ठकसेनाच्या मुसक्या आवळण्यात सुरक्षा-तपास यंत्रणांना यश आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी संबंधिताला अटक केली आहे. किरणभाई पटेल असे संबंधित व्यक्तीचे नाव असून तो गुजरातमधील मूळ रहिवासी आहे. तो स्वत:ला पीएमओचा अतिरिक्त संचालक म्हणवून घेत होता. एवढेच नाही तर सदर ठकसेनाने झेड प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्हीची सुविधाही घेतली होती. तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून काश्मीरची सैर केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी संशयावरून तपास केला असता तो बनावट अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला 10 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र ते गुप्त ठेवण्यात आले होते. जम्मू काश्मीर पोलिसांनी नुकताच त्याच्या अटकेला दुजोरा देत त्याचे सर्व कारनामे उघड केले. सदर ठकसेनाने आपल्या ट्विटर बायोमध्ये पीएचडी केल्याचे नमूद केले आहे. मात्र, पोलीस त्याच्या पदवीचाही तपास करत आहेत.

ठकसेन किरण पटेल याने फेब्रुवारी महिन्यात जम्मू-काश्मीरचा पहिला दौरा केला होता. यावेळी त्यांनी सर्व शासकीय सुविधांचा लाभ घेतला. त्याच्या ट्विटर हँडलवर जम्मू-काश्मीर दौऱ्याचे अनेक व्हिडिओ पोस्ट झालेले आहेत. त्याच्यासोबत सीआरपीएफचे जवानही दिसत आहेत. किरण पटेल याने पीएमओचा अधिकारी असल्याचे भासवून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकाही केल्याचे आता उघड होऊ लागले आहे. सदर बैठका पर्यटनाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. गुप्तचर संस्थेने जम्मू काश्मीर पोलिसांना ठकसेनाबद्दल अलर्ट केले होते. त्यानंतरच त्याच्यावर कडक नजर ठेवण्यात आली होती. पुन्हा जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाताच त्याला अटक करण्यात आली. किरणभाई पटेल याच्यावर भादंवि कलम 419, 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

नवज्योत सिद्धूना एका वर्षाची शिक्षा

Amit Kulkarni

Bharat Bandh : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले ‘हे’ आवाहन

Archana Banage

‘निकटचा स्पर्श’ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

व्यवसाय सुलभतेमध्ये आंध्रला सर्वाधिक पसंती

Patil_p

‘आकाश’ क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

datta jadhav

रामकृष्ण शारदा मठच्या अध्यक्ष प्रब्रजिका भक्तिप्राणा यांचे निधन

Patil_p