बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व एसकेई कन्नड स्कुल आयोजित श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर टिळकवाडी, अनगोळ, शहापूर विभागाच्या प्राथमिक मुला-मुलींच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत मुलाच्या गटात ठळकवाडी संघाने एसकेई कन्नडा संघाचा तर मुलींच्या गटात बालिका आदर्शने ठळकवाडी संघाचा पराभव करुन विजेतेपद मिळविले. व्हॅक्सिनडेपो मैदानावर आयेजित या स्पर्धेत मुलांच्या उपांत्य फेरीत ठळकवाडीने गोमटेशचा तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एसकेई कन्नडाने प्लेजेन्ट कॉनव्हेंट संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात ठळकवाडी संघाने एसकेई कन्नडा संघाचा 12-2 अशा गुण फरकांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या विभागात उपांत्य फेरीच्या सामन्यात बालिका आदर्शने डीपीचा तर ठळकवाडीने स्वाध्याय विद्यामंदिरचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बालिका आदर्शने ठळकवाडीचा 10-4 पराभव करुन विजेतेपद पटकाविले. बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी रणजीपटू मिलिंद चव्हाण, टिळकवाडी विभागाचे अध्यक्ष विवेक पाटील, प्रविण पाटील, संतोष दळवी, उमेश बेळगुंदकर, सी. आर. पाटील यांच्या उपस्थित विजेत्या व उपविजेत्या संघाना चषक देऊन गौरविण्यात आले.
Previous Articleव्ही. एन. शिवणगी संघ खो-खो विजेता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.