कोल्हापूरचे फॉरेन्सिक, एटीएस पथकाचा अंदाज – अंतिम अहवालानंतरच होणार शिक्कामोर्तब
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या शेट्योनगर येथील भीषण स्फोटाबाबत कोल्हापूर येथील फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात आल़ी तसेच मुंबईतील एटीएस पथकानेही घटनास्थळाला भेट fिदल़ी या दोन्ही पथकांच्या प्राथमिक तपासात गॅस सिलेंडरच्या लिकेजमुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आह़े असे असले तरी अद्याप अंतिम अहवाल पोलिसांकडून तयार करणे बाकी आह़े त्यापूर्वी सर्व शक्यतांची पडताळणी पोलिसांकडून केली जात आह़े
18 जानेवारी 2023 रोजी शेट्योनगर येथील ‘आशियाना’ इमारतीमध्ये 4 वाजून 56 मिनिटांनी भीषण धमाका झाला होत़ा हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटात इमारतीचा स्लॅब कोसळून खाली आल़ा तर किचन व हॉलसमोरील भिंतीच्या अक्षरक्ष: ठिकऱ्या उडाल्या होत्य़ा या स्फोटात फ्लॅटचे मालक अश्फाक अहमद काझी (52) हे गंभीर जखमी झाले होत़े त्यांचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा तर त्यांची पत्नी कनिज अश्फाक काझी (48, ऱा शेट्योनगर रत्नागिरी) व सासू नुरूनीसा अल्जी (70, ऱा मजगांव रत्नागिरी), यांचा जागीच मृत्यू झाला होत़ा त्याचप्रमाणे मुलगा अमार अश्फाक काझी (20, ऱा शेट्योनगर मूळ ऱा सोमेश्वर रत्नागिरी) जखमी झाला होत़ा
शेट्योनगर आशियाना इमारतीमध्ये झालेला भीषण स्फोट नेमका कशामुळे झाला या कारणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आह़े दरम्यान पोलिसांकडून विविध ठिकाणी झालेल्या स्फोटांचा आढावा घेण्यात येत आह़े तसेच घटनास्थळी अन्य कोणते पदार्थ आढळून आले नसल्याने गॅस लिकेजमुळेच हा स्फोट झाला असल्याबाबत शक्यता वर्तविण्यात आली आह़े अपघातातील जखमी झालेल्या अश्फाक याने पोलिसांना आपल्या जबाबात सांगितले की, लाईटचे बटण चालू केले असता अचानक स्फोट झाल़ा मात्र गॅस लिकेजचा वास घरातील अन्य लोकांना कसा आला नाही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत़
घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी गॅस गिझरचा सर्वत्र वापर करण्यात येत आह़े हे गॅस गिझर अत्यंत धोकादाय होत असल्याचे अन्य ठिकाणी झालेल्या घटनांवरून दिसून येत आह़े तसेच अत्यंत जुनी इमारत असल्याने स्फोटाची तीव्रता वाढली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान पोलिसांकडून तपास कार्य सुरू असल्याचे सांगण्यात येत आह़े
स्फोटातील जखमी अश्फाक यांचा उपचारादरम्यान मृत्यू
आशियाना इमारतीमध्ये झालेल्या या स्फोटामध्ये मायलेकींचा मृत्यू झाला होत़ा तर अश्फाक काझी व त्यांचा मुलगा अमार हे जखमी झाले होत़े सुमारे 72 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या अश्फाक यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े रविवारी अश्फाक यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े