वन खात्याच्या अधिकाऱयांचे स्पष्टीकरण : कोणीही असे व्हिडिओ व्हायरल करून संभ्रमावस्था निर्माण करू नये
वार्ताहर /किणये
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बाकनूर, बेळवट्टी, बिजगर्णी परिसरातील शेतकऱयांना बिबटय़ाचे दर्शन झाल्यामुळे या भागातील शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. अशी परिस्थिती असतानाच शनिवारी सायंकाळी बाकनूर येथील सातेरी गोडसे यांच्या बैलावरती बिबटय़ाने हल्ला केला. वन खात्याकडून सदर बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अशी परिस्थिती असतानाच सध्या सोशल मीडियावर बाकनूर भागातील बिबटय़ाला पकडला असल्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे.
सदर व्हिडिओ हा बाकनूरचा नाही असे स्पष्टीकरण वन खात्याच्या अधिकाऱयांनी दिले आहे. या व्हिडिओमध्ये चार ते पाच तरुण एका बिबटय़ाला विनाशस्त्र, हाताने पकडते आहेत. आणि तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येऊ लागला आहे आणि बाकनूर भागातील बिबटय़ाला पकडले असे सांगण्यात येऊ लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे कोणीही अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल करू नये, असे आवाहन वन अधिकाऱयांनी केले आहे. शनिवारी सायंकाळी बाकनूर येथील सातेरी गोडसे यांनी आपली जनावरे गवळीवाडा शिवाराकडे चरण्यासाठी सोडली होती. यावेळी बिबटय़ाने त्यांच्या जनावराच्या कळपातील एका बैलावर हल्ला केला होता. या बैलावरती बेळगुंदी पशू चिकित्सालयाच्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केलेले आहेत. जांबोटी वन खात्याच्या अधिकाऱयांकडून सदर परिसराची पाहणी करण्यात आली.
मात्र, बिबटय़ाचा कोणताही सुगावा लागला नाही. याचबरोबर शनिवारी सायंकाळी इनाम बडस येथील दोघा तरुणांनाही बिबटय़ा दिसला. इनामबडस येतील सुशांत हाजगोळकर व त्याचा मित्र दीपक हे दोघेजण बेळवट्टी गावाला येत होते. यावेळी उसाच्या पिकातून बाहेर पडलेला बिबटय़ा त्यांच्या निदर्शनास आला. त्याचबरोबर गेल्या पंधरा दिवसापूर्वी बेळवट्टी गावातील शिवाजी नलावडे व बिजगर्णी गावातील एका शेतकऱयाला बिबटय़ा दिसला होता.
इतर प्राण्यांचा अवमान करू नका : डॉ. नागराज निर्वाणी – वन खात्याचे अधिकारी, जांबोटी
बिबटय़ाला पकडलेला तो व्हिडिओ आम्ही पाहिला आणि त्या व्हिडिओची शहानिशा केली. मात्र, सदर व्हिडिओ हा बाकनूर भागातील नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये, अशी माहिती जांबोटी वन खात्याचे अधिकारी डॉ. नागराज निर्वाणी यांनी दिली आहे. अन्य प्राण्यांबद्दलही नागरिकांनी आदरभाव बाळगावा. वेगवेगळय़ा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करून इतर प्राण्यांचा अपमान करू नये. तसेच समाजामध्ये अफवा पसरू नये, असेही निर्वाणी यांनी सांगितले
सामाजिक भान राखा : जलसिंग राजपूत – वन अधिकारी, बेळगाव
मंडोळी परिसरात सापळा ठेऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावून आम्ही वन खात्याच्यावतीने सर्व पाहणी केलेली आहे. बिबटय़ा सदृश्य प्राणी आढळून आलेला नाही. त्यामुळे सामाजिक भान राखून असे व्हिडिओ व्हायरल करू नये, असे वन खात्याचे अधिकारी जलसिंग राजपूत यांनी सांगितले.