Tarun Bharat

अग्निपथ योजना म्हणजे सैनिकांचा अपमान आहे

Advertisements

काँग्रेस पदाधिकाऱयांचा अग्निपथ योजनेस तीव्र विरोधी : ही योजना रद्द करण्याची मागणी

प्रतिनिधी /म्हापसा

भाजपने आणलेली अग्निपथ योजना म्हणजे सेनेत काम करणाऱयांचा अपमानच आहे. नोकऱयाच्या नावे भाजप सरकारने केलेली ही जनतेची फसवणूकच आहे. राज्यातील युवा पिढीने या योजनेस बळी न पडता अशा फसव्या योजनेला तीव्र विरोध करावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱयांनी म्हापसा गांधी चौकात बोलताना केली.

सरकारच्या अग्निपथ योजनेस विरोध करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी म्हापशात एकवटले होते. त्यांनी घोषणा देत सरकारच्या या योजनेचा तीव्र विरोध केला व ही योजना रद्द करावी अशी एकच मागणी केली. उपअधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथे कडक पोलीस पहारा ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

हा सर्व निवडणुकीचा स्टंट : बिना नाईक

काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा बिना नाईक म्हणाल्या की, भाजपने जी अग्निपथ योजना आणली आहे ती त्यांनी मागे घ्यावी. या योजनेमुळे युवक 4 वर्षानंतर बेकार होतील. त्यांचे पुढे काय याबद्दल काही स्पष्ट नाही. मागील लोकसभा निवडणुकीवेळी 2 कोटी लेकांना नोकऱया देणार असे आश्वासन दिले होते मात्र आता त्याचा कोणताही विचार न करता अग्निपथ योजना भाजपने आणली. हा सगळा निवडणुकीचा स्टंट आहे. त्यांना युवकांचे, महिलांच्या भावितव्याचे काहीच पडलेले नाही अला आरोप बिना नाईक यांनी केला.

मते मिळविण्यासाठी भाजपचा आटापिटा : वरद म्हार्दोळकर

युवा प्रदेश अध्यक्ष वरद म्हार्दोळकर म्हणाले की, अग्निपथ योजनेत चार वर्ष झाली की ब्रेक देणार. 21 वर्षानंतर त्यांच्या भवितव्याचे काय होणार. 46 हजार युवा अग्निवीर म्हणून घेणार त्यांना पुढे जाऊन कोण नोकरी देणार. मिलिट्री ट्रेनिंग घेऊन समाजात या मुलांचा वापर कसा असणार हे सांगता येत नाही. मते मिळविण्यासाठी हा भाजपचा आटापिटा असून आम्ही या अग्निपथ योजनेस तीव्र विरोध करीत असून ती रद्द करावी अशी मागणी यावेळी म्हार्दोळकर यांनी केली.

अग्निपथ योजना म्हणजे सेनेचा अपमान आहे- अमरनाथ पणजीकर

अमरनाथ पणजीकर म्हणाले की, भाजप योजनेला विविध नावे देऊन फसवणूक करीत आहे. लोकसभा निवडणूक डोळ्य़ासमोर ठेवून युवा वर्गाची फसवणूक करण्याची योजना भाजपने काढली आहे. केंद्र सरकारने दरवर्षी 2 कोटी नोकऱया देणार सांगितले त्याही कुठे पोचल्या हेही कुणालाच माहीत नाही. या योजनेद्वारे सेनेचा अपमान केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेनी सुदीन नाईक व संजय बर्डे यांचीही भाषणे झाली.

Related Stories

धान्यासाठी बेतोडय़ात मजूरांची झुंबड सामाजिक अंतराचा भंग

Omkar B

कृष्णा साळकर यांचा भाजपात प्रवेश

Amit Kulkarni

कोविड हॉस्पिटलातून रुग्ण पळाला पण…

Patil_p

म्हादई विषयी सरकार अपयशी

tarunbharat

फोंडय़ातील सफा मशिदच्या तटबंदीचा भाग कोसळला

Omkar B

इंग्रजी शाळांचे सरकारी अनुदान त्वरित बंद करावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!