प्रतिनिधी / बेळगाव
वाङ्मय चर्चा मंडळाची 2021-22 सालची वार्षिक सभा रविवार दि. 16 रोजी सकाळी 10.30 वाजता मंडळाच्या सभागृहात पार पडली. मंडळाच्या प्रमुख नीता कुलकर्णी यांनी स्वागत केले. अध्यक्षस्थानी मंडळाचे उपाध्यक्ष गोविंद फडके होते. मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकुर व विठ्ठल याळगी यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.
यावेळी कार्यकारिणी सदस्य श्रीधर कुलकर्णी यांनी गतवर्षातील कार्यक्रमांचा आढावा घेतला. कार्यवाह विजय देशपांडे यांनी वार्षिक जमा-खर्च सादर केला. गतवर्षाच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कार्यकारिणी सदस्य रोहन दळवी यांनी सादर केले. 2022-23 सालासाठीचे अंदाजपत्रक खजिनदार स्वाती कुलकर्णी यांनी सादर केले. त्याला सभेने मंजुरी दिली. व्यवस्थापिका स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारिणी सदस्य माधव कुंटे यांनी आभार मानले.