Tarun Bharat

फोंडय़ातील (एअरपोर्ट रोड) अप्रोच रोडचे होणार ‘श्री अरबिंदो मार्ग’नामकरण

Advertisements

फोंडा पालीकेच्या खास बैठकीत ठराव : पालीकेकडे सीसीटीव्ही कॅमेऱयासाठी फंड नाही,कचरा गोळा करणाऱया कंत्राटदाराला मुदतवाढ,केरया खांडेपार कचरा प्रकल्प 15 ऑगस्टपुर्वी पुनः कार्यान्वित करणार

प्रतिनिधी /फोंडा

फोंडय़ातील वरचा बाजार येथील मार्केट प्रकल्प गाठण्यासाठी असलेला बहुचर्चित अप्रोच रोड (म्हणजेच फोंडावासियांचा एअरपोर्ट रोड) चे नामांतरण श्री अरबिंदो मार्ग  असे करण्यात येणार असल्याचा ठराव काल शुक्रवारी फोंडा पालीकेच्या झालेल्या खास बैठकीत घेतल्याची माहिती पालीकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली.

यावेळी पालीकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी व नगरसेवक उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार श्री अरबिंदो घोष यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्यातील पालीका क्षेत्रातील एका मार्गाचे नामकरण त्याच्या नावाने करून त्याना आदरांजली वाहण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत फोंडय़ाच्या अप्रोच रोडचे नामकरण करण्यात आले आहे. वरचा बाजार येथील आठवडी बुधवार पेठ बाजार गाठण्यासाठी असलेल्या अप्रोच रोडचे उद्घाटन 19 डिसें. 2011 रोजी त्याकाळी मुख्यमंत्रीपदी व सद्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांच्याहस्ते झाले होते. तब्बल 11 वर्षानी या रोडचे नामकरण श्री अरबिंदो मार्ग या नावाची पाटी लागणार आहे. त्यानंतर अप्रोच रोड व एअरपोर्ट हा गुंता कायमचा सुटणार आहे. वाहतूक कोंडीतून बुधवार पेठ मार्केट गाठण्यासाठी 300 मिटरचा लांबीचा रस्ता ग्राहकांना उपयुक्त ठरलेला आहे. मागील काही वर्षी या रूंद रस्त्यावर चतुर्थीचा माटोळी बाजारही भरविण्यात आला होता. त्यानंतर कोरोना महामारीच्या काळात दान्ही बाजूनी व्यापाऱयांनी व्यापून टाकला होता. 

कचरा गोळा करणाऱया कंत्राटदाराला मुदतवाढ

पालीकेतर्फे सर्व 15 प्रभागातून घरोघरी कचरा गोळा करणाऱया कंत्राटदाराची मुदत 30 सप्टें. रोजी संपत असून सदर कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र ही मुदतवाढ देताना ती सहा महिन्यासाठी की पुर्ण वर्षासाठी यावर शिक्कामोर्तब पालीका प्राधिकरणाच्या निर्णयानंतर होईल. ओला व सुका कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी केरया खांडेपार येथील कचरा प्रकल्प येत्या 15 ऑगस्टपुर्वी पुनः कार्यान्वित करण्यात येणार आहे. वर्षाकाठी 7 टन कचऱयाच्या विल्हेंवाटीसाठी हा कचरा प्रक्रिया प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

आल्मेदा हायस्कुल वाहतूक कोंडीवर भुयारी मार्ग उपाय

फोंडयातील दुचाकी व चारचाकींना भेडसावणाऱया पार्कीगसाठी खुल्या जागेचे पर्याय शोधून तेथे पार्किगसाठी जागा आरक्षित करण्याचे सोपस्कर पुर्ण करण्याकडे पालीकेचे कटाक्षाने लक्ष असल्याची माहिती दिली. तसेच फोंडा पोलीस स्थानक येथील खुल्या जागेचाही सदुपयोग पार्कीगसाठी करण्यात येणार आहे. आल्मेदा हायस्कूलच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करताना सर्व विद्यार्थ्यांना भुयारी मार्गातून ये-जा ची व्यवस्था करण्यासंबंधी महत्वाची बैठक हायस्कूलचे मुख्याध्यापिका, वाहतूक पोलिस व नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी तोडगा काढताना आल्मेदा हायस्कूलच्या तीनही गेटमधून विद्यार्थ्याना एकाचवेळी न सोडता भुयारी मार्ग (सबवे) मार्गातून थेट प्रिन्स हेरीटेज इमारतीसमोरील पादचारी मार्गातून जुने बसस्थानक येथे सोडण्यात येईल. त्यानंतर सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना येथून घरी न्यावे अशी सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी पादचारी मार्गावर लोखंडी ग्रिल बसविण्यात येईल. गणेश चतुर्थीनंतर हा मार्ग खुला करण्याचे संकेत रितेश नाईक यांनी दिले.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पालीकेकडे फंड नाही

फोंडा शहर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी पालीकेकडे फंड नसून केंद्र सरकारच्या निर्भया फंडातून हे काम येत्या काळात हाती घेण्यात येणार आहे. पालीकेतर्फे नोंदणी केलेल्या स्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी सुमारे 80 लाख रूपयांचा निधी गरज असल्याची माहिती रितेश नाईक यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीनिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर पालीका बैठकीत तिरंगा ध्वजाचे अनावरण यावेळी करण्यात आले.

Related Stories

भाजपातून लढायचे की स्वतंत्र हे कार्यकर्तेच ठरवतील..!

Amit Kulkarni

गोवा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. पद्माकर दुभाषी यांचे निधन

Omkar B

कोविड रूग्णांच्या सेवेसाठी फोंडय़ात ‘सात’ रूग्णवाहिकेची ‘साथ’

Patil_p

शुक्रवारी सापडले 190 नवे कोरोनाबाधित

Omkar B

भाजपावासी आमदारांना भवितव्याची चिंता

Patil_p

आज उमेदवारांचे चित्र होणार स्पष्ट

Amit Kulkarni
error: Content is protected !!