बांदा / प्रतिनिधी –
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सर्वांची लगबग आता सुरू झालीय.गणेशमूर्ती बनवणाऱ्या मूर्तीशाळा आता जोर धरू लागल्यात. विविध प्रतिकृती असलेले गणपती बाप्पा आकाराला येत आहेत.प्लॅस्टर ऑफ पॅरिस पेक्षा पारंपारिक माती वापरून मूर्त्या बनवल्या जाणे गरजेचं आहे.जिल्ह्यात बाजारपेठा आतापासूनच गजबजायला लागल्यात.त्यामुळे, लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्साही आहे.