Tarun Bharat

मान्सूनच्या आगमनाने बळिराजाला दिलासा

पावसामुळे हवामानामध्ये कमालीचा गारवा

प्रतिनिधी /बेळगाव

साऱयांचेच डोळे आकाशाकडे लागले होते. मान्सूनचे आगमन कधी होणार याची उत्सुकता लागली होती. हवामान खात्याने 15 जूननंतर मान्सून दाखल होईल, असे भाकित केले होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे शुक्रवारी पहाटेपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रामध्ये पावसाचा शिडकावा झाला तरी दुपारी व सायंकाळी काहीसा मोठा पाऊस पडला आहे. त्यामुळे मान्सूनला आता सुरुवात झाली आहे.

खरीप पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही शेतकऱयांनी पेरणी पूर्ण केली आहे. बेळगाव तालुक्मयातील अनेक भागामध्ये भाताची उगवणही झाली आहे. त्यामुळे पावसाची नितांत गरज होती. शुक्रवारी पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे हवेमध्ये काहीसा गारवाही निर्माण झाला आहे.

यावषी वळिवाच्या दमदार पावसामुळे शेतकऱयांना मोठा त्रास झाला. मशागत करणेदेखील कठीण झाले होते. त्याच परिस्थितीत शेतकऱयांनी मोठय़ा कष्टाने मशागत करून पेरणी केली आहे. काही भागामध्ये ओल्याव्यामध्येच पेरणी केली तर काही ठिकाणी मशागत करून धूळवाफ पेरणी केली आहे. या सर्व पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यामुळे शेतकऱयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप म्हणावा तसा पावसाला जोर नाही. गुरुवारी सायंकाळपासून हवामानामध्ये बराच बदल झाला होता. ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी सकाळी काही प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर उन पडले. त्यामुळे पाऊस अधिक येणार अशी शक्मयता वर्तविली जात होती. दुपारनंतर बऱयापैकी सरी कोसळल्यामुळे वाहन चालक, बैठय़ा व्यापाऱयांना काहीसा त्रास सहन करावा लागला आहे.

Related Stories

चन्नम्मानगर विविध समस्यांच्या विळख्यात

Amit Kulkarni

बागायतीला नरेगा योजनेची जोड

Amit Kulkarni

मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांचा रविवारी नागरी सत्कार

Amit Kulkarni

धोकादायक फांद्या हटविल्या

Patil_p

चक्क शाळकरी मुलांनी पोलीस स्थानकात मारली एन्ट्री …

Rohit Salunke

भटक्या कुत्र्यांसंदर्भात लेखी तक्रार बंधनकारक

Amit Kulkarni