सांखळीत मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार
सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्याग्रस्त नागरिकांनी सांखळी रवींद्र भवन परिसरात जनता दरबार कार्यक्रमात हजेरी लावून आपल्या समस्या मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडल्या.
सांखळी मतदारसंघातिल पाळी, वेळगे, सुर्ल,कुडणे, न्हावेली, आमोणा, हरवळे, आणि सांखळी नगर पालिका क्षेत्रातिल अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समोर मांडल्या. पावसाळय़ात ग्रामीण भागात मानव निर्मित निर्माण होणाऱया समस्या पंचायत पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे काही नागरिकांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
डिचोली पत्रकार संघ सदस्यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद
प्रसंगी डिचोली पत्रकार संघाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत याच्याशी संवाद साधला आणि विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी अध्यक्ष रविराज चारी, उपाध्यक्ष सुरेश बायेकर, सदस्य विनायक सामंत यांची उपस्थिती होती.
पंचायत निवडणूक इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
पंचायत निवडणूक जवळ आल्याने सांखळी मतदारसंघातील काही भाजप समर्थक काही इच्छुक उमेदवारानी शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.