Tarun Bharat

Kolhapur; कोल्हापुरात मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात वातावरण तापलं; शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसत आहे. कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी शिवसैनिकांकडून त्यांच्याविरोधात निदर्शने केली जाणार होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी शनिवारी सकाळपासून शिवसैनिकांची धरपकड सुरु केली आहे.

काहीवेळापूर्वीच एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस संजय पवार यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. यावेळी संजय पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा जोरदार निषेध केला.
“आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. मग तुम्ही दडपशाही का करत आहात,” असा सवाल संजय पवार यांनी विचारला. त्यानंतर संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी संजय पवार यांना गाडीत बसवले. तेव्हा संजय पवार यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. हे कार्यकर्ते संजय पवार यांच्या गाडीसमोर आडवे पडले. तर काहीजण त्याठिकाणी ठिय्या देऊन बसले होते. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना एक-एक करून बाजूला करायला सुरुवात केली. या सगळ्यामुळे सध्या कोल्हापुरातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. आता पोलीस संजय पवार आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना किती काळ ताब्यात ठेवणार, हे पाहावे लागेल.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येणार आहेत.दुपारी ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि यावेळी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार होते मात्र या आंदोलना पूर्वीच पोलिसांनी शिवसैनिक व युवा सैनिकांच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामध्ये जिल्हाप्रमुख संजय पवार, हर्षल सुर्वे तसेच युवासेनेचे म्हणजेच माने व उपशहर प्रमुख वैभव जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक आहेत.

Related Stories

जिल्हय़ात कडक लॉकडाऊनला आरंभ

Patil_p

भूकंपाच्या दोन धक्क्यांनी पाटण तालुका हादरला

Patil_p

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आढावा बैठकांना वेग

Patil_p

गोकुळचा दूध उत्पादकांना दिलासा; गोकुळ दूध खरेदी दरात वाढ

Archana Banage

ओमिक्रॉन बाधितांपैकी ५० टक्के रुग्ण लसीचे दोन्ही डोस घेतलेले

Abhijeet Khandekar

पुणेकरांना मोठा दिलासा; प्रशासनाने घेतला ‘हा’ धाडसी निर्णय

Archana Banage