Tarun Bharat

बॅलेन्स टेस्टने कळणार तुमचे आर्युमान

10 सेकंद एका पायावर उभे न राहिल्यास……

उत्तम आणि दीर्घ आयुष्य जगण्यासाठी संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे. हे केवळ मानसिक नव्हे तर शारीरिक दृष्टय़ाही गरजेचे आहे. ब्राझीलमध्ये अलिकडेच झालेल्या एका संशोधनानुसार 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक जर एका पायावर 10 सेकंदांपेक्षा अधिक काळ उभे राहू न शकल्यास त्यांचा पुढील 10 वर्षांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट होते.

Advertisements

10 सेकंदांचे छोटे बॅलेन्स टेस्ट लोकांच्या मृत्यूबद्दल सांगू शकते का हे समजून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी संशोधनाद्वारे केला आहे. तसेच या चाचणीला रुग्णांच्या नियमित आरोग्य तपासणीत जोडले जावे का यावरही संशोधन करण्यात आले आहे. याकरता संशोधनात 1,700 लोकांना सामील करण्यात आले. 2009-20 पर्यंत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पहिल्या टेस्टवेळी त्यांचे वय 51-75 वर्षे होते, त्यांचे सरासरी वय 61 वर्षे राहिले. यातील 68 टक्के लोक पुरुष होते.

10 वर्षांच्या संशोधनात 21 टक्के लोक बॅलेन्स टेस्टमध्ये अपयशी ठरले. याचबरोबर वयासोबत टेस्टमध्ये अपयशी ठरण्याचा धोकाही वाढत गेला. 71-75 वयोगटातील 54 टक्के लोक या चाचणीत पास झाले नाहीत. तर 51-55 वयोगटातील 5 टक्के, 56-60 वयोगटातील 8 टक्के, 61-65 वयोगटातील 18 टक्के आणि 66-70 वयोगटातील 37 टक्के लोक टेस्टमध्ये अपयशी ठरले आहेत.

संशोधनाचे निष्कर्ष

10 वर्षांच्या संशोधनात वैज्ञानिकांना बॅलेन्स टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या लोकांचा मृत्यू लवकर होण्याची शक्यता वाढत असल्याचे आढळून आले. अपयशी ठरणाऱयांमध्ये सुमारे 17.5 टक्के लोकांनी पुढील 10 वर्षांमध्ये स्वतःचा जीव गमावला. तर यशस्वी ठरणाऱया लोकांमध्ये हे प्रमाण 4.6 टक्के होते. जे लोक बॅलेन्स टेस्टमध्ये अपयशी ठरले, त्यांच्यात स्थुलत्व, उच्च रक्तदाब, कोरोनरी आर्टरी डिसिज आणि डिसलिपिडेमिया यासारखे आजार होते असेही वैज्ञानिकांनी आढळून आले.

मृत्यूचा धोका

संशोधनादरम्यान मृत्युमुखी पडणाऱया लोकांचे लिंग, वय आणि वैद्यकीय पार्श्वभूमी विचारात घेण्यात आली.  वृद्ध तसेच इतर आजारांनी ग्रस्त आणि बॅलेन्स टेस्टमध्ये अपयशी ठरलेले लोक पुढील 10 वर्षांमध्ये मृत्यूचा धोका 84 टक्क्यांपर्यंत असतो असे वैज्ञानिकांना दिसून आले.

बॅलेन्स टेस्ट

बॅलेन्स टेस्ट सहजपणे घरातूनही करता येते. यात कुठल्याही एका पायावर 10 सेकंदांसाठी उभे रहावे लागते. वर केलेला पाय उभ्या पायाच्या मागे घेण्यात यावा. दोन्ही हात बाजूला ठेवावेत. चाचणीदरम्यान आय लेव्हलवर 2 मीटर अंतरावर पाहावे. टेस्टसाठी स्वतःला तीन प्रयत्न द्यावेत.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी गुगलकडून डूडलमध्ये कोडिंग गेम

prashant_c

काडेपेटीत मावणारी साडी

Patil_p

25 वर्षांच्या जावयाशी 50 वर्षांची सासू विवाहबद्ध

Patil_p

ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये रंगले डे सेलिब्रेशन

prashant_c

दिलासादायक : कोरोनामुक्ती दरात भारत अव्वल स्थानी

Rohan_P

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी मोडली 48 वर्षांची परंपरा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!