Tarun Bharat

झेलेंस्की यांची स्वाक्षरी असलेल्या बॉलचा होणार लिलाव

11 मेपर्यंत चालणार लिलाव ः जमा रकमेतून युक्रेनला मदत केली जाणार

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. सातत्याने होणाऱया बॉम्बवर्षावामुळे युक्रेनियन शहरांचा उर्वरित जगासोबतचा संपर्क तुटला आहे. पायाभूत सुविधांना मोठे नुकसान पोहोचले आहे. याचदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांची स्वाक्षरी असलेल्या एका बॉलचा लिलाव होणार आहे. या लिलावाद्वारे प्राप्त होणाऱया रकमेतून युक्रेनमधील लोकांना मदत केली जाणार आहे

मेजर लीग बेसबॉलच्या या बॉलवर अध्यक्ष झेलेंस्की यांनी 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या दौऱयादरम्यान स्वाक्षरी केली होती. झेलेंस्की यांनी मेजर लीग बेसबॉल लोगोच्या खाली काळय़ा रंगाच्या पेनद्वारे स्वाक्षरी केली होती. त्यांनी इंग्रजीत ‘झेलेंस्की’ असेही लिहिले होते. उपलब्ध माहितीनुसार हा बॉल अत्यंत चांगल्या स्थितीत असून कमीत कमी 15 हजार डॉलर्समध्ये म्हणजेच 11 लाख 47 हजारांहून अधिक किमतीत विकला जाणार आहे.

न्यूयॉर्कमध्ये रँडी एल. कपलान या बॉलचा लिलाव करणार आहेत. हा बॉल त्यांना संयुक्त राष्ट्रसंघात युक्रेनचे राजदूत वोल्दोमिर येलचेंको यांनी भेटवस्तूच्या स्वरुपात दिला होता. बॉलच्या लिलावातून प्राप्त होणारी रक्कम कपलान हे युक्रेनच्या मदतनिधीत जमा करणार आहेत. हा लिलाव 11 मेपर्यंत चालणार आहे.

Related Stories

रशियात आम्हाला दहशतवादी नकोत!

Patil_p

चीनच्या तुलनेत भारतात होतोय दुप्पट मुलांचा जन्म

Patil_p

जर्मनीतल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संशयाचे वारे

Patil_p

स्वीडनमध्ये धार्मिक दंगली सुरूच

Patil_p

व्हर्च्युअल डिबेटपासून ट्रम्प राहणार दूर

Patil_p

…अशी आहे ब्राझीलमध्ये कोरोनाची सद्यस्थिती

datta jadhav